३० हजार विद्यार्थ्यांनी दिली सायन्स एक्स्प्रेसला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:56 AM2017-07-30T00:56:41+5:302017-07-30T00:57:55+5:30

murtizapur,science,express,30,thousand,students,visited | ३० हजार विद्यार्थ्यांनी दिली सायन्स एक्स्प्रेसला भेट

३० हजार विद्यार्थ्यांनी दिली सायन्स एक्स्प्रेसला भेट

Next
ठळक मुद्देमूर्तिजापुरात एक दिवस होता मुक्काम

लोकमत न्यूज नेटवर्क
मूर्तिजापूर : देशापुढे पाणी आणि वायू प्रदूषणाची मोठी समस्या असल्याने आगामी पिढीला या प्रदूषणाची जाणीव व्हावी आणि त्यांनी प्रदूषणमुक्तीसाठी तत्पर असावे, असा संदेश घेऊन निघालेली सायन्स एक्स्प्रेस मूर्तिजापूरमध्ये दाखल झाली. एकदिवसीय प्रदर्शनामध्ये शहरातील सुमारे ३० हजार विद्यार्थ्यांनी या एक्स्प्रेसला भेट दिली. या ट्रेनमध्ये असलेल्या सुमारे ३०० मॉडल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात आला.
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्यावतीने सायन्स एक्स्प्रेस देशभर फिरून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करीत आहे. या ट्रेनने आतापर्यंत १ लाख ५६ हजार ५०० किलोमीटरचा प्रवास केला आहे. मूर्तिजापूर येथील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर सायन्स एक्स्प्रेसने नागरिकांना पर्यावरण जागृतीचा संदेश दिला. गेल्या आठ वर्षांपासून विज्ञानाच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये जागृती करणाºया या उपक्रमांतर्गत यंदा पाणी आणि वातावरणातील प्रदूषणावर जागृती मोहीम सुरू केली आहे.
पाणी प्रदूषणामुळे जागतिक पातळीवर मोठा धोका निर्माण झाला असून, त्याबाबतचे उपाय आणि उपचार याविषयी १३ डब्यांच्या या एक्स्प्रेसमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. यापूर्वी या एक्स्प्रेसच्या माध्यमातून जैवविविधतेविषयी देशभर जागृती अभियान चालविले होते. आता पाणी आणि हवा प्रदूषणाची जनजागृती केली जात आहे.

मान्यवरांनी दिली भेट
सायन्स एक्स्प्रेसचे शहरात आगमन झाल्यानंतर खासदार संजय धोत्रे यांच्या हस्ते फीत कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार हरीश पिंपळे, नगराध्यक्ष मोनाली गावंडे, भाजपचे शहर अध्यक्ष भारत भगत, रावसाहेब कांबे, सभापती स्नेहा नाकट, रावसाहेब कांबे, सतीशचंद्र शर्मा आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मूर्तिजापूर येथे एकदिवसीय प्रदर्शनामध्ये ३० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला आहे. १३ डब्यांच्या या प्रदर्शनात तरुण पिढीला जागृत करण्याची संकल्पना आहे. तरुणांकडून यास प्रतिसाद लाभत आहे.
- रुबल बोरा,व्यवस्थापक, विज्ञान एक्स्प्रेस

 

Web Title: murtizapur,science,express,30,thousand,students,visited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.