मूर्तिजापूर पाणीपुरवठा योजना हस्तांतरणास वेग
By Admin | Updated: August 3, 2014 00:28 IST2014-08-03T00:28:30+5:302014-08-03T00:28:30+5:30
पाणीपुरवठा योजना लवकरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित होणार आहे

मूर्तिजापूर पाणीपुरवठा योजना हस्तांतरणास वेग
मूर्तिजापूर : स्थानिक नगर परिषदेच्या अखत्यारित असलेली पाणीपुरवठा योजना लवकरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित होणार आहे. सदर योजना मजीप्राकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून, माजी नगराध्यक्ष नसरीन तबस्सूम निजामोद्दीन यांनीही तसा ठराव देऊन अनुकूलता दर्शविली होती. तसेच मजीप्रानेही ही योजना ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे, अशी माहिती माजी नगरसेवक कृष्णराव गावंडे यांनी दिली.
मूर्तिजापूरची पाणीपुरवठा योजना २00१ मध्ये मजिप्राकडेच होती. त्यानंतर नगर परिषदेच्या माध्यमातून शहराला पाणीपुरवठा करण्याचे ठरल्याने नगर परिषदेने ही योजना स्वत:च्या ताब्यात घेतली. दरम्यानच्या काळात स्थानिक पाणीपुरवठा योजना पुन्हा मजीप्राकडे द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक कृष्णराव गावंडे यांनी उचलून धरली व त्याचा पाठपुरावा केला. अखेर जिल्हाधिकारी आणि मजीप्राचे कार्यकारी अभियंता, प्रकल्प अधिकारी, मूर्तिजापूर न. प. मुख्याधिकारी यांच्यादरम्यान याबाबत एक बैठक झाली. चर्चेअंती मजीप्राने सदर पाणीपुरवठा योजना ताब्यात घेण्यास हिरवी झेंडी दर्शविली, अशी माहिती कृष्णराव गावंडे यांनी दिली.