मूर्तिजापूर पं. स.ला प्रथम पुरस्कार; सभापती व गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:22 IST2021-08-22T04:22:17+5:302021-08-22T04:22:17+5:30

कार्यक्रमात सर्वप्रथम राजीव गांधी यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन व पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. काँग्रेस ...

Murtijapur Pt. S. first prize; Chairman and Group Development Officer felicitated | मूर्तिजापूर पं. स.ला प्रथम पुरस्कार; सभापती व गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार

मूर्तिजापूर पं. स.ला प्रथम पुरस्कार; सभापती व गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार

कार्यक्रमात सर्वप्रथम राजीव गांधी यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन व पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष बबनराव डाबेराव, काँग्रेस कमिटी सरचिटणीस बंडू डाखोरे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते घरकुल महाआवास योजनेमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल केंद्र पुरस्कृत जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार तसेच आणखी आठ पुरस्कार मूर्तिजापूर पंचायत समिती व तालुक्यातील ग्रामपंचायतला प्राप्त झाला आहे. त्याबद्दल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस, सभापती ऊर्मिला डाबेराव, पंचायत समिती सदस्य दादारावजी किर्दक, प्रकाश वानरे यांचा सत्कार काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बंडूभाऊ डाखोरे व शहर काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष रोहित सोळंके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काँग्रेस सेवादलाचे सुनील वानखडे, विधानसभा अध्यक्ष काँग्रेस शहाबुद्दीन, विपीन सोळंके, किशोर सोनोने, वंजारे, नागोराव तायडे, अरविंद पंधेकर, सोहेल चाऊस, सुभाष वडे, संतोष नाखले, लळे, अमर उघडे आदी उपस्थित होते.

Web Title: Murtijapur Pt. S. first prize; Chairman and Group Development Officer felicitated