मूर्तिजापुरात घराला आग, ५ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 15:09 IST2020-12-29T13:26:51+5:302020-12-29T15:09:53+5:30

Fire News शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता आहे.

Murtijapur house fire, loss of Rs 5 lakh | मूर्तिजापुरात घराला आग, ५ लाखांचे नुकसान

मूर्तिजापुरात घराला आग, ५ लाखांचे नुकसान

मूर्तिजापूर : येथील स्टेशन विभाग जयस्तंभ चौकातील एका घराला सकाळी १०:३० वाजताच्या दरम्यान आग लागून ५ लाखाचे नुकसान झाल्याची घटना २९ डिसेंबर रोजी घडली.
        येथील जयस्तंभ चौकात  राहणारे प्रसिद्ध व्यापारी संजय जयकिसन डागा यांच्या राहत्या घराला भिषण आग लागून ५ लाखाचे नुकसान झाल्याचे अंदाज संजय डागा यांनी 'लोकमत' बोलताना सांगितले, घटनेच्या वेळी घरातील सर्व व्यक्ती बाजूला असलेल्या घरी काही कामानिमित्त घेतल्या होत्या  त्यांच्या घराला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची अंदाज वर्तविण्यात येत असला तरी नेमकी आग कशामुळे लागली हे निश्चित कारण स्पष्ट होऊ शकले नाही. आगीत त्यांचे संपूर्ण घर बेचिराख झाले असून घरातील  वस्तू, फर्निचर, गॅस सिलिंडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या, या आगीत त्यांचे किमान ५ लाखाचे नुकसान झाल्याचे बोलल्या जात आहे. पहाता आगीने रौद्ररूप धारण केले. या आठवड्यात घराला आग लागल्याची ही दुसरी घटना आहे शुक्रवारी येथेल टांगा चौकात एक घर आगीत बेचिराख झाले होते. आगीला आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक नागरीकांच्या मदतीने व नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न केले. वृत लिहिस्तोवर आग सुरूच होती.

Web Title: Murtijapur house fire, loss of Rs 5 lakh