नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:14 IST2021-06-21T04:14:29+5:302021-06-21T04:14:29+5:30

अकाेला : सिव्हील लाइन्स पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नीट परीक्षेच्या तयारीसाठी भाडेतत्त्वावर रहिवासी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दाेन मित्रांमध्ये वाद ...

Murder of a student who was preparing for a good exam | नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या

नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या

अकाेला : सिव्हील लाइन्स पाेलीस ठाण्याच्या हद्दीत नीट परीक्षेच्या तयारीसाठी भाडेतत्त्वावर रहिवासी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील दाेन मित्रांमध्ये वाद झाल्यानंतर एकाने दुसऱ्याचा गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली़ प्रतीक लवंगे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे़ या प्रकरणी सिव्हील लाइन्स पाेलिसांनी अल्पवयीन मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़

बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेला प्रतीक लवंगे व त्याचा जिवलग मित्र दाेघेही अकाेल्यात नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी भाडेतत्त्वावर खाेली करून राहत हाेते़ या दाेघांमध्ये १७ जूनच्या रात्री उशिरा किरकाेळ कारणावरून वाद झाला. या वादात प्रतीक लवंगे आणि त्याचा मित्र यांच्यात झटापट झाल्यानंतर प्रतीकला गंभीर दुखापत झाली़ त्यानंतर संतापलेल्या अल्पवयीन मित्राने प्रतीकचा गळा आवळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला़ या घटनेची माहिती मिळताच सिव्हील लाईन्स पाेलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळावर दाखल झाले़ त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात पाठविला़ शनिवारी रात्री उशिरा उत्तरीय तपासणीचा प्राथमिक अहवाल प्राप्त हाेताच त्यामध्ये प्रतीकची गळा आवळून हत्या झाल्याचे समाेर आले़ त्यामुळे सिव्हील लाईन्स पाेलिसांनी उशिरा रात्री खुनाचा गुन्हा दाखल केला़ त्यानंतर अल्पवयीन आराेपीस ताब्यात घेण्यात आले असून त्याला बालसुधार गृहात पाठविल्याची माहिती आहे़

दाेघेही हाेते जिवलग मित्र

प्रतीक लवंगे व त्याचा मित्र दाेघेही लहानपणापासून साेबत राहत हाेते़ दाेघेही जिवलग मित्र असल्याने नीट परीक्षेची तयारीही त्यांनी साेबतच सुरू केली हाेती़ मात्र शुक्रवारी मध्यरात्री त्यांच्यात नेमका कशावरून वाद झाला आणि एकाने दुसऱ्याची गळा आवळून हत्या केली़ एक जगातून निघून गेला तर दुसऱ्यावर हत्येचा आराेप लागल्याने त्याचेही भविष्य अंधकारमय झाल्याची चर्चा आहे़

Web Title: Murder of a student who was preparing for a good exam