मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:20 IST2021-02-05T06:20:08+5:302021-02-05T06:20:08+5:30
काेराेनाच्या काळात वैद्यकीय आराेग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव धाेक्यात घालून काेराेनाबाधित रुग्णांवर उपचार केले. यादरम्यान, अनेक डाॅक्टर, अधिकारी व ...

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला प्रारंभ
काेराेनाच्या काळात वैद्यकीय आराेग्य यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जीव धाेक्यात घालून काेराेनाबाधित रुग्णांवर उपचार केले. यादरम्यान, अनेक डाॅक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांना काेराेनाची लागण झाली. वैद्यकीय आराेग्य यंत्रणा, पाेलीस विभाग व इतर अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या विभागातील फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जाणार आहे. त्या अनुषंगाने बुधवारी मनपातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस टाेचण्याला प्रारंभ करण्यात आला. काेविन ॲपवर माहिती अपलाेड केलेल्या कर्मचाऱ्यांना बुधवारी लस टाेचण्यात आली. यामध्ये सर्वप्रथम आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर यांना लस टोचून सुरुवात करण्यात आली. तसेच नगरसचिव अनिल बिडवे व मनपातील इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
या वेळी मनपाचे प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारूख शेख, नोडल अधिकारी डॉ. अनुप चौधरी, डॉ. विजय चव्हाण, डॉ. मनीषा बोरेकर, डॉ. अजमल खान, डॉ. श्रेयश देशमुख, डॉ. झेलम देशमुख, योगेश माल्टे, लसटोचक पुष्पा सुलताने आदी डॉक्टर व वैद्यकीय आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती हाेती.
...फाेटाे मेलवर...