अकाेला महापालिका अडकली चाैकशीच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2020 15:54 IST2020-11-08T15:54:47+5:302020-11-08T15:54:57+5:30

मागील काही दिवसांपासून महापालिकेत विराेधी पक्ष शिवसेना कमालीचा आक्रमक झाल्याचे समाेर आले आहे.

Municipal Corporation stuck in the round of enquiry | अकाेला महापालिका अडकली चाैकशीच्या फेऱ्यात

अकाेला महापालिका अडकली चाैकशीच्या फेऱ्यात

अकाेला: सत्तापक्ष भाजपने २ जुलै, ३० सप्टेंबर व २९ ऑक्टाेबर २०२० राेजी आयाेजित केलेल्या तीनही सर्वसाधारण सभा वादाच्या भाेवऱ्यात सापडल्या आहेत. विराेधी पक्ष शिवसेनेने बाह्या वर खाेचत सदर तीनही सभेतील नियमबाह्य कामकाजाविराेधात नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी चाैकशीचा आदेश जारी केला. विभागीय आयुक्तांचा आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडे माहिती सादर करताना मनपा प्रशासनाची चांगलीच धांदल उडाल्याची माहिती आहे. मागील काही दिवसांपासून महापालिकेत विराेधी पक्ष शिवसेना कमालीचा आक्रमक झाल्याचे समाेर आले आहे.

सत्ताधारी भाजपने आयाेजित केलेल्या सवर्साधारण सभेतील ठराव नियमबाह्यरित्या मंजूर केल्या जात असल्याचा आराेप करीत सेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी तक्रारींचे हत्यार उपसले आहे. विषय सूचीवरील विविध विषयांवर चर्चा न करता तसेच विराेधी पक्षातील नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या प्रशनांचे निराकरण न करता अवघ्या काही मिनिटात सभा गुंडाळल्या जात असल्याचे अनेकदा पाहावयास मिळाले आहे. तसेच सत्तापक्षाकडून नियमबाह्यरित्या मंजूर करणयात आलेले ठराव रद्द करणयासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे दाद मागितल्यानंतरही आयुक्त कारवाई करीत नसल्याचे पाहून गटनेता राजेश मिश्रा यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच विभागीय आयुक्तांकडे धाव घेऊन न्याय देण्याची मागणी केली. प्राप्त तक्रारींचे स्वरूप लक्षात घेता शासनाच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्तांनी संबंधित सभेतील कामकाज, मंजूर करणयात आलेले इतिवृत्त व प्रशासनाच्या निर्णयाची चाैकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश जारी केला हाेता.

 

Web Title: Municipal Corporation stuck in the round of enquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.