महापालिका भ्रष्ट कारभाराचा अड्डा झाली आहे - राजेश मिश्रा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 01:30 PM2019-01-23T13:30:41+5:302019-01-23T13:32:39+5:30

अकोला: सत्ताधारी भाजपच्या कालावधीत विविध घोळ समोर येत आहेत. त्यावर अंकुश लावण्यात सत्तापक्ष सपशेल अपयशी ठरला असून, महापालिका भ्रष्ट कारभाराचा अड्डा झाल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी सभागृहात केला.

The municipal corporation has become the capital of corruption - Rajesh Mishra | महापालिका भ्रष्ट कारभाराचा अड्डा झाली आहे - राजेश मिश्रा  

महापालिका भ्रष्ट कारभाराचा अड्डा झाली आहे - राजेश मिश्रा  

Next

अकोला: सत्ताधारी भाजपच्या कालावधीत विविध घोळ समोर येत आहेत. त्यावर अंकुश लावण्यात सत्तापक्ष सपशेल अपयशी ठरला असून, महापालिका भ्रष्ट कारभाराचा अड्डा झाल्याचा घणाघाती आरोप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी सभागृहात केला. सिमेंट रस्ते प्रकरणात कंत्राटदारावर काय कारवाई केली पाहिजे, यावर चर्चा न करता ती भरकटल्याचे सांगत काँग्रेस नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी ‘जाना था जापान पहुँच गये चीन’, अशी मार्मिक टिप्पणी केली. त्यावेळी राजेश मिश्रा यांनी तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्यामुळेच शहरातील अरुंद रस्ते प्रशस्त झाल्याचे सांगत लहाने हे तांत्रिक अधिकारी नसल्याचे आवर्जून सांगितले.
सिमेंट रस्त्यांचा मुद्दा उपस्थित होताच भाजपचे गटनेता राहुल देशमुख, गिरीश गोखले यांनी निविदेचे दर, रस्ते देखभाल दुरुस्तीचा कालावधी आदी मुद्यांवर प्रशासनाने प्रकाशझोत टाकण्याची सूचना केली. विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार कंत्राटदावर ३० दिवसांच्या आत कारवाई करण्याचे नमूद केल्यानंतरही कारवाईला विलंब होत असल्याबद्दल शंका उपस्थित केली. जिल्हाधिकाºयांकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त प्रभार असताना त्यांनी याप्रकरणी कारवाई का केली नाही, त्यांच्यावर कोणाचा दबाव होता, असा प्रश्न साजीद खान यांनी उपस्थित केला. यावर भाजप लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर रस्त्यांची तपासणी केली असून, कोणाचीही पाठराखण केली जात नसल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी सांगितले.


कॅनॉलच्या मुद्यावर घसे कोरडे!
मागील वर्षभरापासून डाबकी रोड ते जुना बाळापूर रोडपर्यंतच्या कॅनॉलची मोजणी केली जात आहे. भाजपने जाणीवपूर्वक या रस्त्याचे काम थंड बस्त्यात टाकल्याचा आरोप शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांनी केला. मोजणी प्रक्रिया तातडीने पूर्ण करून या रस्त्याचे तातडीने निर्माण करण्याची मागणी भाजप नगरसेवक सुनील क्षीरसागर, सेनेच्या मंजूषा शेळके यांनी केली. या मुद्यावर नगरसेवक घसे कोरडे करीत असले तरी महापौर विजय अग्रवाल यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. आश्रय नगरमधील जलकुंभाची सुरक्षा ‘राम भरोसे’ असून, त्या ठिकाणी आवारभिंत, पथदिवे व सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी, अशी सूचना सुनील क्षीरसागर यांनी केली.


नगरसेवक उवाच्...
जिल्हाधिकाºयांच्या अहवालात कंत्राटदारावर चार प्रकारची कारवाई निश्चित केली आहे. त्यापैकी क्रमांक दोननुसार कंत्राटदाराकडून रस्त्यांची पूर्ण दुरुस्ती करण्यासह त्यांच्यावर दहा वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी निश्चित करावी.

-  हरीश आलिमचंदानी

 रस्ते दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात यावी. - साजीद खान पठाण


जिल्हाधिकाºयांच्या अहवालानुसार कंत्राटदारावर कारवाई करा, नुकसान भरपाई घेऊन रस्ते दुरुस्तीचा कालावधी निश्चित करा, या प्रकरणामुळे ८० नगरसेवकांवर मलिदा लाटल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने निष्पक्ष कारवाई करावी.

- डॉ. जिशान हुसेन


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ना खाऊंगा ना खाने दुँगा’ या नाºयाची पोलखोल झाली. भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पत्र दिल्यावर आठ महिन्यांनी कारवाईचा मुहूर्त. एकूणच चित्र पाहता संगनमताने भ्रष्टाचार झाल्याचे दिसते.

- मोहम्मद मुस्तफा

रस्ते प्रकरणी भाजपासह प्रशासनावर वेळकाढूपणाचे आरोप होत आहेत. प्रशासनाने ‘व्हीएनआयटी’मार्फत चौकशीचा कालावधी स्पष्ट करावा.

-  गिरीश गोखले


रस्ते प्रकरणामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांना बदनामीला सामोरे जावे लागत आहे. भाजपने वेळकाढूपणा न करता कारवाईसंदर्भात भूमिका स्पष्ट करावी, ठोस निर्णयाची अपेक्षा आहे.

-  अ‍ॅड. धनश्री देव


भाजप नगरसेवकाचा सभागृहात शिमगा
सिमेंट रस्त्यांचा मुद्दा पटलावर असतानाच भाजप नगरसेवक सुभाष खंडारे यांनी निकृष्ट नालीचे बांधकाम करणाºया कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी लावून धरीत सभागृह अक्षरश: डोक्यावर घेतले. गिरीश गोखले यांनीसुद्धा महापौरांनी कारवाईसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. या मुद्यावरून महापौर व गिरीश गोखले यांच्यात चांगलीच बाचाबाची झाल्याचे दिसून आले. महापौर अग्रवाल कारवाई करीत नसल्याचे पाहून नगरसेवक सुभाष खंडारे यांनी महापौरांच्या समोर जमिनीवर झोपून निषेध केला. त्यांना गटनेता राहुल देशमुख, गिरीश गोखले यांनी उचलून खुर्चीवर बसविले.

पत्रकारांचा अपमान; ठराव पारित करा!
जिल्हाधिकाºयांनी पत्रकारांचा अपमान केल्याचा निंदनीय प्रकार उजेडात आला आहे. निष्पक्ष लिखाण करणाºया पत्रकारांचा अधिकारी अपमान क रीत असतील तर त्यांच्याविरोधात कारवाईचा ठराव शासनाकडे पाठविण्याची मागणी भाजप नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी सभागृहात केली. त्यावर आजच्या सभेत हा विषय नसल्याचे महापौर विजय अग्रवाल यांनी स्पष्ट केले. वेळेवरच्या विषयांतही सत्ताधारी या मुद्यावर निर्णय घेऊ शकले असते.
 

 

Web Title: The municipal corporation has become the capital of corruption - Rajesh Mishra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.