शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

मनपा आयुक्तांचा आदेश धाब्यावर; केबल जप्तीच्या कारवाईला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 1:51 PM

मागील दोन दिवसांत या विभागाने बजावलेले कर्तव्य लक्षात घेता आयुक्तांच्या आदेशाला ठेंगा दाखवल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महापालिकेला प्रतिसाद न देणाऱ्या मोबाइल कंपन्यांचा हेकेखोरपणा लक्षात घेता आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधित कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी विविध प्रकारच्या कारवाया करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मनपा क्षेत्रातील इमारती, महावितरण कंपन्यांचे विद्युत खांब तसेच मनपाच्या पथखाबांवरील केबलचे जाळे जप्त करण्याचे निर्देश विद्युत विभाग प्रमुख अमोल डोईफोडे यांना दिले होते. आयुक्तांच्या आदेशाला धाब्यावर बसवत विद्युत विभागाने केबल जप्तीच्या कारवाईला ठेंगा दाखवला असून, कारवाईसाठी या विभागाकडून चालढकल केले जात असल्याची माहिती आहे.मनपाकडे कोट्यवधी रुपयांचे ‘रिस्टोरेशन चार्ज’ जमा न करता मोबाइल कंपन्यांकडून परस्पर फायबर आॅप्टिक केबलचे जाळे टाकल्या जात आहे. प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात असतानाच शहर विकासाचा गवगवा करणाºया सत्ताधारी भाजपमधील पदाधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवणे पसंत केल्याची बाब लक्षात येताच आमदार रणधीर सावरकर यांनी प्रशासनाला दोषी आढळून येणाºया मोबाइल कंपन्यांवर कठोर कारवाईचे निर्देश दिले.आ. सावरकर यांच्या पत्राची दखल घेत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी स्टरलाइट टेक कंपनी तसेच रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीला खोदकामाचा परवाना व इतर दस्तावेज सादर करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीत स्टरलाइट कंपनीने मनपाकडे अहवाल सादर केला. रिलायन्स कंपनीने २०१४ मधील परवानगी व नकाशा सादर केला.मोबाइल कंपन्या प्रतिसाद देत नसल्याचे पाहून आयुक्त कापडणीस यांनी संपूर्ण शहरातील इमारती, विद्युत खांब व पथदिव्यांवरून टाकण्यात आलेले ‘ओव्हरहेड केबल’ जप्त करण्याचा आदेश विद्युत विभागाला जारी केला. साहजिकच, मनपाचा एक-दोन नव्हे तर तब्बल ३० ते ३५ कोटी रुपयांचा महसूल बुडविणाºया कंपन्यांचे केबल जप्त करण्यासाठी विद्युत विभागाने धडक कारवाई राबवणे अपेक्षित होते. मागील दोन दिवसांत या विभागाने बजावलेले कर्तव्य लक्षात घेता आयुक्तांच्या आदेशाला ठेंगा दाखवल्याचे समोर आले आहे.

ठरावाची अंमलबजावणी नाहीच!मनपा क्षेत्रातील नागरिकांच्या घरोघरी केबलच्या माध्यमातून विविध खासगी चॅनेलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये मोबाइल कंपन्यांचाही समावेश आहे. संबंधित कंपन्यांची दैनंदिन उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. संबंधित कंपन्यांनी इमारती, विद्युत खांब, मनपाचे पथदिवे यावर केबल टाकण्यासाठी मनपाची पूर्वपरवानगी घेऊन रीतसर शुल्क जमा करणे भाग आहे. याकरिता सभागृहाने आठ महिन्यांपूर्वी ठरावही मंजूर केला आहे. या ठरावाची प्रशासनाने आजपर्यंतही अंमलबजावणी केली नाही, हे येथे उल्लेखनीय.

आयुक्त साहेब हे चाललंय काय?मनपा आयुक्तांनी बांधकाम विभागाचे प्रभारी शहर अभियंता सुरेश हुंगे, प्रभारी कार्यकारी अभियंता अजय गुजर यांना रिलायन्सचे केबल खंडित करण्याचा आदेश दिला आहे. दोन्ही अधिकाºयांची कार्यशैली पाहता त्यांनी वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे. हीच बाब विद्युत विभागाला लागू पडत असल्याने आयुक्त साहेब हे चाललंय काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका