मुंबई, पुण्याचे बुकिंग आठवडाभर हाऊसफुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2020 06:39 AM2020-11-17T06:39:00+5:302020-11-17T06:39:39+5:30

दरही प्रचंड वाढले; ४ ते ५ हजार प्रवासभाडे

Mumbai, Pune bookings housefull throughout the week | मुंबई, पुण्याचे बुकिंग आठवडाभर हाऊसफुल्ल

मुंबई, पुण्याचे बुकिंग आठवडाभर हाऊसफुल्ल

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : अकाेल्यावरून मुंबई तसेच पुण्याकडे जाण्यासाठीचे बुकिंग आठवडाभर हाउसफुल असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी व ट्रॅव्हल्स संचालकांनी दिली. अकाेला जिल्ह्यातील हजाराे तरुण-तरुणी नाेकरीसाठी पुणे, औरंगाबाद, नाशिक, मुंबई आणि नागपूर येथे कार्यरत आहेत. हे नाेकरदार दिवाळी सणासाठी गावाकडे परतले हाेते. मात्र आता त्यांनी परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली असून, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस व खासगी बसचे बुकिंग सुरू केले आहे. 


या दाेन्ही लांब पल्ल्याच्या बसेसचे दर प्रचंड वाढले असतानाही आठवडाभर या गाड्यांचे बुकिंग हाऊसफुल असल्याचे वास्तव आहे. दिवाळीच्या पृष्ठभूमीवर ही गर्दी उसळली असून, आठवड्यानंतर १५ दिवस ही गर्दी कमी कमी हाेत राहील, अशी माहिती परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या पाच शहरांमध्ये सर्वाधिक गर्दी मुंबई, पुणे, नाशिक व नागपूरकडे जाणाऱ्या गाड्यांवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे दर वाढले असताताही बुकिंग फुल आहे.

परतीच्या प्रवासाची स्थिती
परतीच्या प्रवासात मात्र गर्दी कमी झाल्याचे वास्तव असून, या गाड्या परतीच्या प्रवासात खालीच येत असल्याचेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे परतीच्या प्रवासात थांबे वाढवून या बसफेऱ्या सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. परतीच्या प्रवासात दर कायम आहेत, मात्र येणाऱ्यांची संख्याच नसल्याचे वास्तव आहे.


अकाेल्यावरून पुण्याकडे जास्त फेऱ्या
अकाेल्यावरून पुणे व नाशिक येथे जाण्यासाठी जास्त बसफेऱ्या लावण्यात आलेल्या आहेत. शिवशाही या बससह निमआराम व हिरकणी बसेसही पुणे, औरंगाबाद, नाशिक व नागपूरसाठी साेडण्यात येत आहेत. या मार्गावर ६० पेक्षा अधिक बसफेऱ्या सुुरू करण्यात आलेल्या आहेत. मात्र तरीही बुकिंग सुरूच आहे.


लांब पल्ल्याच्या 
फेऱ्या वाढविल्या

अकाेल्यावरून मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूरसाठी १४ नाेव्हेंबर ते २४ नाेव्हेंबर या कालावधीसाठी १०० पेक्षा अधिक बसफेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.  २४ नाेव्हेंबरनंतर या बसफेऱ्या कमी करण्यात येणार असल्याची माहिती सू्त्रांनी दिली आहे.

खासगी ट्रॅव्हल्सला प्रचंड प्रतिसाद
राज्य महामंडळाच्या बसेससाेबतच खासगी ट्रॅव्हल्सलाही प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद असल्याची माहिती आहे. या ट्रॅव्हल्स संचालकांनी प्रवासाचे दरही माेठ्या प्रमाणात वाढविले आहे; मात्र त्यानंतरही अकाेला शहरातून पुणे व मुंबईसाठी राेज ३० पेक्षा अधिक ट्रॅव्हल्स रवाना हाेत असल्याची माहिती आहे.

Web Title: Mumbai, Pune bookings housefull throughout the week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.