‘मिसेस इंडिया ब्यूटी क्विन’ स्पर्धेत अकोल्याच्या डॉ. प्रज्ञा वरठे ‘सेकंड रनर-अप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 16:30 IST2018-09-14T16:28:12+5:302018-09-14T16:30:05+5:30
‘मिसेस इंडिया ब्यूटी क्विन २०१८’ स्पर्धेत अकोल्याच्या डॉ. प्रज्ञा विनीत वरठे यांनी द्वितीय उपविजेतेपदाचा (सेकंड रनरअप)बहुमान मिळाला आहे.

‘मिसेस इंडिया ब्यूटी क्विन’ स्पर्धेत अकोल्याच्या डॉ. प्रज्ञा वरठे ‘सेकंड रनर-अप’
अकोला : राज्य व राष्ट्रीय स्तरावर विवाहित महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता वाव्ह फाउंडेशनतर्फे चंदीगड येथे गत आठवड्यात घेण्यात आलेल्या ‘मिसेस इंडिया ब्यूटी क्विन २०१८’ स्पर्धेत अकोल्याच्या डॉ. प्रज्ञा विनीत वरठे यांना द्वितीय उपविजेतेपदाचा (सेकंड रनरअप)बहुमान मिळाला आहे.
या स्पर्धेत देशभरातून विविध महिलांनी भाग घेतला. या स्पर्धेत राजस्थानच्या डॉ. नीतू लाहोटी या मिसेस इंडिया ब्युटी क्लासिक २०१८ म्हणून घोषित झाल्या. गुजरातच्या हेमॅक्सी वनवाला, महाराष्टÑातून अकोलाच्या डॉ. प्रज्ञा वरठे, लखनवच्या आंग्ली सक्सेना यांना अनुक्रमे ‘फर्स्ट’, ‘सेकंड’ आणि ‘थर्ड’ रनरअप म्हणून घोषित करण्यात आल्या. डॉ. प्रज्ञा या अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बालचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. विनीत वरठे यांच्या पत्नी आहेत. या स्पर्धेत विविध प्रकारची वेशभूषा, पारंपरिक वेशभूषा, औपचारिक गाउन, आयक्यू राउंड, टॅलेंट क्यू राउंड, टॅलेंट राउंड, फिटनेस राउंड इ. प्रकारचे राउंड घेण्यात आले. या विविध राउंडकरिता देशातील नामांकित डिझायनर व मॉडेल्स परीक्षक म्हणून लाभले.या राष्टÑीय स्पर्धेतील विजेता विश्वस्तरावर चीनमध्ये होणाऱ्या स्पर्धेत भाग घेतील, तर रनरउप कॅनडा येथे पुढील आंतरराष्टÑीय स्पर्धेत भारतातर्फे भाग घेतील.