अकोल्यात २० उपकेंद्रांवर होणार एमपीएसी पूर्व परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2018 13:55 IST2018-06-08T13:55:00+5:302018-06-08T13:55:00+5:30
अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क (पूर्व) परीक्षा-२०१८ चे १० जून २०१८ रोजी अकोला जिल्ह्यातील एकूण २० उपकेंद्रांवर सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत आयोजन केलेले आहे.

अकोल्यात २० उपकेंद्रांवर होणार एमपीएसी पूर्व परीक्षा
अकोला: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट क (पूर्व) परीक्षा-२०१८ चे १० जून २०१८ रोजी अकोला जिल्ह्यातील एकूण २० उपकेंद्रांवर सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत आयोजन केलेले आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी जिल्ह्यातील २० उपकेंद्रांवर १० जून २०१८ रोजी सकाळी ८.०० ते संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या आतील संपूर्ण परिसरात व केंद्राच्या बाहेरील लागून असलेल्या १०० मीटर परिसरात खालील उपकेंद्रांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहे.
असे आहेत उपकेंद्र
खंडेलवाल ज्ञानमंदिर कॉन्व्हेंट गोरक्षण रोड अकोला, शिवाजी आर्ट, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज,( मोर्णा बिल्डिंग) शिवाजी पार्क, अकोट रोड अकोला, शिवाजी आर्ट, कॉमर्स अॅन्ड सायन्स कॉलेज, (पूर्णा बिल्डिंग) शिवाजी पार्क, अकोट रोड, अकोला, सीताबाई कला महाविद्यालय सिव्हिल लाइन रोड अकोला, न्यू इंग्लिश हायस्कूल रामदासपेठ पोलीस स्टेशन जवळ अकोला, जागृती विद्यालय व उच्च माध्य विद्यालय, रणपिसे नगर, अकोला, नोएल स्कूल, एसटी विभागीय वर्कशापच्या बाजूला कौलखेड, रोड अकोला, श्री शिवाजी हायस्कूल मुख्य शाखा देशमुख पेठ शिवाजी पार्क अकोट रोड अकोला, भारत विद्यालय तापडिया नगर,अकोला, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट डाबकी रोड जुने शहर अकोला, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय गोडबोले प्लॉट डाबकी रोड अकोला, गुरुनानक विद्यालय गांधीनगर सिंधी कॅम्प अकोला, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल/ज्युनिअर कॉलेज शिक्षण संकुल रामदासपेठ अकोला, श्री शिवाजी विद्यालय, हरिहर पेठ जुने शहर अकोला, राधाकिशन लक्ष्मीनारायण तोष्णीवाल सायन्स कॉलेज सिव्हिल लाइन रोड अकोला, बी.आर. हायस्कूल ताजनापेठ मुख्य डाक घरामागे अकोला, श्रीमती मेहरबानू ज्यू कॉलेज आॅफ सायन्स गांधी रोड अकोला, कोठारी कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूल विद्या नगर गोरक्षण रोड, अकोला, मनुताई कन्या शाळा टिळक रोड सिटी कोतवाली पोलीस स्टेशनजवळ अकोला, श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय मूर्तिजापूर रोड नेहरू पार्क अकोला.