कला शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मनपात हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 15:03 IST2019-04-29T15:03:42+5:302019-04-29T15:03:52+5:30

अकोला: महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत अस्थायी नऊ कला शिक्षकांना मनपा प्रशासनाने बडतर्फ केले होते. यापैकी सात बडतर्फ शिक्षकांनी शिक्षण विभागात पुनर्नियुक्तीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

Movement for the appointment of art teachers | कला शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मनपात हालचाली

कला शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मनपात हालचाली

अकोला: महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत अस्थायी नऊ कला शिक्षकांना मनपा प्रशासनाने बडतर्फ केले होते. यापैकी सात बडतर्फ शिक्षकांनी शिक्षण विभागात पुनर्नियुक्तीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मध्यंतरी संबंधित कर्मचाऱ्यांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेऊन सेवेत सामावून घेण्याची विनंती केली होती. त्यानुषंगाने बडतर्फ शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीच्या फाइलचा प्रवास नव्याने सुरू झाला असून, याप्रकरणी नागपूर हायकोर्टाचा आदेश लक्षात घेता आयुक्त संजय कापडणीस, उपायुक्त विजयकुमार म्हसाळ काय अभिप्राय देतात, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत अस्थायी नऊ कला शिक्षकांची नियुक्ती नियमबाह्य असल्याचा मुद्दा शिक्षण विभागाने उपस्थित केला होता. शिक्षण विभागाचा अभिप्राय लक्षात घेऊन एकाच मुद्यावर काही अस्थायी कला शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अनेक याचिका दाखल करून ठेवल्या होत्या. यातील काही शिक्षकांना पाचव्या वेतन आयोगाची रक्कम व महागाई भत्ता अदा झाल्याचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक संजय गणोरकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सदर शिक्षकांची नियुक्ती नियमबाह्य असल्यामुळे त्यांना अदा केलेली रक्कम वेतनातून वसूल करण्याचा आदेश जारी केला होता. यादरम्यान, नागपूर खंडपीठानेसुद्धा अस्थायी शिक्षकांबद्दल मनपा प्रशासनाने ठोस निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. शिक्षण विभागातील कर्मचाºयांना हाताशी धरून जाणीवपूर्वक निर्माण केलेला गोंधळ ध्यानात घेता महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी अस्थायी कला शिक्षकांच्या नियुक्ती प्रकरणाचा बारकाईने अभ्यास करून निष्कर्षाअंती सर्व नऊ कला शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई केली होती.

कापडणीस म्हणाले, नियमानुसार होईल!
बडतर्फ शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी तत्कालीन आयुक्त अजय लहाने, जितेंद्र वाघ यांच्यावर भाजपमधील एका नेत्याकडून सातत्याने दबावतंत्राचा वापर करण्यात आला. याप्रकरणी नागपूर हायकोर्टाचा आदेश लक्षात घेता हा दबाव झुगारत तत्कालीन दोन्ही आयुक्तांनी बडतर्फ शिक्षकांना बाजूला सारले. त्यानंतर संबंधित कर्मचाºयांनी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना विनंती केली असता, त्यांनी नियमानुसार कामकाज होणार असल्याचे स्पष्ट केले होते.

फाइलचा प्रवास सुरू; अधिकाºयांची परीक्षा
बडतर्फ कर्मचाºयांच्या फाइलचा प्रवास नव्याने सुरू झाला आहे. याप्रकरणी तत्कालीन दोन्ही आयुक्तांनी घेतलेली भूमिका पाहता आयुक्त संजय कापडणीस व उपायुक्त विजयकुमार म्हसाळ यांची कसोटी लागणार आहे.

 

Web Title: Movement for the appointment of art teachers