तलवार घेऊन फिरणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 02:56 IST2017-08-09T02:55:38+5:302017-08-09T02:56:45+5:30

अकोला: पोलीस मुख्यालयासमोर तलवार घेऊन फिरणार्‍या एका आरोपीस सिटी कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The motorist hangs with the sword | तलवार घेऊन फिरणारा अटकेत

तलवार घेऊन फिरणारा अटकेत

ठळक मुद्देतलवार जप्त गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पोलीस मुख्यालयासमोर तलवार घेऊन फिरणार्‍या एका आरोपीस सिटी कोतवाली पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस मुख्यालयासमोर सागर दुर्गादास चंदेल आणि सोनू ऊर्फ प्रवीण गोपाल इंगळे हे दोघे हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमळे यांना मिळाली. त्यांनी पोलीस कर्मचार्‍यांसह या ठिकाणी धाव घेऊन इंगळे व चंदेल या दोघांना अटक केली. 
त्यांच्याकडून तलवार जप्त करण्यात आली असून, दोघांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात शोध पथकाचे विपुल सोळंके व कर्मचार्‍यांनी केली.

Web Title: The motorist hangs with the sword