पेट्रोलपंपावरून मोटारसायकल लंपास

By Admin | Updated: April 10, 2015 01:43 IST2015-04-10T01:43:26+5:302015-04-10T01:43:26+5:30

आकोटात चोरट्यांचा उच्छाद.

Motorcycle lamps from petrol pump | पेट्रोलपंपावरून मोटारसायकल लंपास

पेट्रोलपंपावरून मोटारसायकल लंपास

आकोट : येथील अंजनगाव मार्गावरील एका पेट्रोलपंपावरून तेथीलच कर्मचार्‍याची मोटारसायकल लंपास झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल झाली आहे. या तक्रारीनुसार, ९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. अंजनगाव मार्गावरील पेट्रोलपंपावर कार्यरत असलेला कर्मचारी पंकज सोळंके याने अशोक सोळंके यांच्या मालकीची एमएच ३0 ए ५४0८ क्रमांकाची मोटारसायकल कामावर नेली होती. ३0 जानेवारीच्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्याने सदर मोटारसायकल लंपास केली. मोटारसायकलची सर्वत्र शोधाशोध करूनही मिळून आली नाही. त्यामुळे अशोक माणिकराव सोळंके यांनी आकोट शहर पो. स्टे. ला तक्रार दिली. त्यावरून ९ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याविरुध्द भादंविच्या ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Motorcycle lamps from petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.