मोटार पंप चोर गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:19 IST2021-05-18T04:19:05+5:302021-05-18T04:19:05+5:30

अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पंकज बॉडी बिल्डर येथून मोटार पंप चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी ...

Motor pump thief Gajaad | मोटार पंप चोर गजाआड

मोटार पंप चोर गजाआड

अकोला : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या पंकज बॉडी बिल्डर येथून मोटार पंप चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. या चोरट्याची न्यायालयाने कारागृहात रवानगी केल्याची माहिती आहे.

पंकज शामराव उपाध्ये यांच्या मालकीचे एमआयडीसीमध्ये पंकज बॉडी बिल्डर हे प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानमधून अज्ञात चोरट्याने मोटार पंप चोरी केले होते. या प्रकरणाची तक्रार एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता शिवर येथील रहिवासी हेमंत राजू भाटिया यांनी ही मोटार पंप चोरी केल्याची माहिती समोर आली. यावरून एमआयडीसी पोलिसांनी हेमंत भाटिया यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने मोटार पंप चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी १५ हजार रुपये किमतीचे मोटार पंप जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखेडे, दयाराम राठोड, नीलेश भोजने, संतोष डाबेराव यांनी केली.

Web Title: Motor pump thief Gajaad