शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या २०० पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना हवी कायम नोकरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 11:35 IST

Akola News कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम नोकरीमध्ये समावून घेण्याची मागणी आरोग्य संघटनांमधून केली जात आहे.

ठळक मुद्देरुग्णसेवेसाठी तत्काळ कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली होती. रुग्णांमध्ये कलामीची घट झाल्याने जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले.२००पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले.

अकोला : कोरोना काळात स्वत:च्या जिवाची बाजी लावून रुग्णसेवा देणाऱ्या कंत्राटी अधिपरिचारीकांना पूर्वसूचना न देताच नोकरीवरून कमी करण्यात आले. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून रोष व्यक्त केला जात आहे. कोविड काळातील रुग्णसेवेचा विचार करता जिल्ह्यातील २००पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम नोकरीमध्ये समावून घेण्याची मागणी आरोग्य संघटनांमधून केली जात आहे. कोरोना काळात रुग्णसेवेसाठी तत्काळ कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्यात आली होती. सहा महिन्यांपर्यंत जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळत नाही, तोपर्यंत या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा कायम ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले होते. सप्टेंबर महिन्यानंतर कोविड रुग्णांमध्ये कलामीची घट झाल्याने जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे जवळपास २००पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करण्यात आले. अचानक सेवेतून कमी करण्यात आल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांमधून रोष व्यक्त केला जात असून, त्यांना कायम सेवेत सामावून घेण्याची मागणी आरोग्य संघटनांकडून केली जात आहे.

कंत्राटी स्टाफ कामावर नसल्याने बेरोजगारी

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढले. अशातच अधिपरिचारीकांना रुग्णसेवेसोबतच रोजगाराचीही संधी मिळाल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. परंतु, रुग्णसंख्या कमी होताच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी करण्यात आले. अचानक रोजगार गेल्याने जिल्ह्यातील २००पेक्षा जास्त जणांवर बेरोजगारी ओढवल्याची माहिती समोर आली आहे.

 

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या

  • गुणवत्ता यादीनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती, मग सेवेतून काढतानादेखील त्याच आधारे निर्णय घेणे आवश्यक.
  • कुठलीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी करणे योग्य नाही. प्रशासनाने रुग्णसेवेतून कमी करताना पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.
  • कोविड काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरुवातीला जेवण, पिण्याचे पाणी दिले गेले. परंतु, नंतर त्यांच्या या सुविधा बंद करण्यात आल्याने बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले. या सुविधा कायम ठेवण्यात याव्या.
  • सेवेतून काढण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवेत सामावून घ्यावे. तसेच त्यांना नियमित वेतन द्यावे.

 

कोरोना काळात रुग्णसेवा दिली, परंतु, प्रशासनाने कुठलीही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी केले. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्याना तत्काळ सेवेत सामावून घ्यावे.

- स्वाती गजानन शेलवट, कंत्राटी कर्मचारी

 

अचानक सेवेतून कमी करण्यात आल्याने अनेकांवर बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. प्रशासनाने याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीत सामावून घ्यावे.

- रचना वाहूरवाघ, कंत्राटी कर्मचारी

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस