धनगर समाजाचा ‘एसडीओ’ कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: August 23, 2014 02:18 IST2014-08-23T00:02:12+5:302014-08-23T02:18:19+5:30
मूर्तिजापूर येथे आरक्षणाची मागणीसाठी धनगर समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.

धनगर समाजाचा ‘एसडीओ’ कार्यालयावर मोर्चा
मूर्तिजापूर: इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी)चे आरक्षण मिळून त्यांना ह्यएसटीह्णचे जात प्रमाणपत्रही देण्यात यावे, या मागणीसाठी तालुक्यातील धनगर समाजाच्यावतीने शुक्रवार, २२ ऑगस्ट रोजी येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी जी.एस. निपाने यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज मोठय़ा प्रमाणात आहे. धनगर आणि धनगड हे दोन्ही समाज एकच असून, केवळ एका छोट्या त्रुटीमुळे हा समाज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. गत ६७ वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. इतर राज्यात धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. केंद्राद्वारे गठित चलीया समितीने वर्ष २00२ मध्ये धनगर व धनगड हे दोन्ही समाज एकच असल्याचा अभिप्राय दिला होता. हाच अभिप्राय अलाहबाद उच्च न्यायालयानेही दिला होता. त्यामुळे महाराष्ट्रातही धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करून त्यांना तसे प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी तालुका धनगर समाजाच्यावतीने शुक्रवारी येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेल्या मोर्चात धनगर समाजातील पुरुष, महिला आपल्या शेळय़ा-मेंढय़ा आदी जनावरांसह सहभागी झाले होते. या मोर्चाचा समारोप उपविभागीय कार्यालयात झाला. तेथे उपविभागीय अधिकारी निपाने यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी माजी पं.स. सदस्य मोहन रोकडे, सुरेश जोगळे, महादेवराव तिरकर, विनोद नागे, सुनील सरोदे, अशोक तिरकर, सुधाकर गोंडसे, प्रा. एल. डी. सरोदे, रवी शितोळे यांच्यासह धनगर समाजबांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.