अकोला जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस

By Admin | Updated: June 1, 2014 22:41 IST2014-06-01T21:08:14+5:302014-06-01T22:41:03+5:30

अकोला जिल्ह्यात सायंकाळच्या सुमारास वादळी वार्‍यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली.

Monsoon rainfall in Akola district | अकोला जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस

अकोला जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस

अकोला: जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवार १ जून रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वार्‍यासह मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वार्‍यामुळे दहिहांडा परिसरात अनेक घरांसह वृक्षांची पडण्याच्या घटनाही घडल्या असून, एक जण जखमी झाल्याचर घटनाही घडली आहे.
जिल्ह्यात रविवार १ जून रोजी सायकांळी अनेक ठिकाणी वादळी वार्‍याला सुरुवात झाली. काही ठिकाणी वादळी वार्‍यासह मान्सून पूर्व पावसाच्या सरीही आल्या. अकोला शहरासह तालुक्यातील दहिहांडासह गणोरी, हिंगणी बु., रोहणा, काटी, पाटी, ब्रम्हपुरी, वडद बु. आणि खु., कट्यार, म्हैसांग, दापुरा, मजलापूर, रामगांव, त्या शिवाय बार्शीटाकळी तालुक्यातील करतखेडा येथे, तर मूर्तिजापूर तालुक्यातील जामठी बु. आणि परिसरातील गांवात सोसाट्याच्या वार्‍यायह पावसाच्या सरी आल्या. यामुळे विज पुरवठा खंडित होण्यासह अनेक घरांची पडझड झाली. दहीहांडासह दापुरा परीसरात वादळी वार्‍याने प्रचंड नुकसान झाले असून, घरांच्या पडझडीसह वृक्ष उन्मळून त्याखाली वाहने दबल्याच्या घटनाही घडल्या.  

Web Title: Monsoon rainfall in Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.