आई मला शाळेला जायचय...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:20 IST2021-02-05T06:20:04+5:302021-02-05T06:20:04+5:30
शाळेत जायंचच आहे. घरात आता कंटाळा येत आहे. तसेच ऑनलाईन शिक्षणातही अडचणी येतात. शाळा बंद असल्याने अभ्यासही होत नव्हता. ...

आई मला शाळेला जायचय...
शाळेत जायंचच आहे. घरात आता कंटाळा येत आहे. तसेच ऑनलाईन शिक्षणातही अडचणी येतात. शाळा बंद असल्याने अभ्यासही होत नव्हता. आता कोरोनाची लस आल्यामुळे भीतीचे कारण नाही. परंतु एक दिवसाआड शाळा असावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना करून शाळेत जाणार आहे.
- सार्थक दीपक तायडे इयत्ता ५वी, जागृती विद्यालय
शाळेत जाण्याची उत्सुकता आहे. पालकांनीही संमती दिली आहे. शाळेत गेल्यावर अभ्यास होईल. ऑनलाईन शिक्षण घेताना अडचणी येत होत्या. शिकविलेले समजत नव्हते. बऱ्याच दिवसांनी शाळेत जायला मिळणार असल्याने आनंदी आहे.
-दीपा संतोष भट्टड, इ. ६वी, जागृती विद्यालय
दहा महिन्यांपासून शाळा बंद आहे. ऑनलाईन शिक्षण घेतानाही अडचणी येत आहेत. आता शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळेत दररोज अभ्यास, गृहपाठ होईल. घरात राहूनही आता कंटाळा आला आहे. बऱ्याच महिन्यांनंतर शाळेत जायला मिळणार असल्याने उत्साही आहे.
-अर्पित कळंब, इयत्ता ७वी फुलपाखरू शाळा
घरी अभ्यास होत नाही. आता शाळा सुरू होणार असल्याने पालकसुद्धा शाळेत पाठविण्यासाठी तयार आहेत. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आदी नियमांचे पालन करणार आहे.
- समीक्षा ज्ञानेश्वर साबळे, इयत्ता ८ वी, जागृती विद्यालय