घरावर दगडफेक करुन महिलेचा विनयभंग

By Admin | Updated: June 10, 2016 01:59 IST2016-06-10T01:59:27+5:302016-06-10T01:59:27+5:30

पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा.

Molestation of woman by stone pelting at home | घरावर दगडफेक करुन महिलेचा विनयभंग

घरावर दगडफेक करुन महिलेचा विनयभंग

खामगाव : घरावर दगडफेक करून ४0 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना ७ जून रोजी ढोरपगाव येथे घडली. याप्रकरणी पिं.राजा पोलिसांनी महिलेने ८ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ४0 वर्षीय महिलेने पिं.राजा पोस्टेला तक्रार दिली की, विठ्ठल विश्‍वनाथ चोपडे यांनी माझ्या घरावर दगड फेकला. याबाबत पतीने त्याला जाब विचारला असता, विठ्ठल चोपडे याने पतीला शिवीगाळ केली. याबाबत पती पोस्टेला तक्रार द्यायला गेले असता, विठ्ठल चोपडे याने गैरकायदेशीर मंडळी जमवून अश्लिल शिवीगाळ करीत दिरानीचा विनयभंग केला व जिवे मारण्याची धमकी दिली. या तक्रारीवरून पिं.राजा पोलिसांनी विठ्ठल विश्‍वनाथ चोपडे, भगवान प्रकाश चोपडे, सागर विठ्ठल चोपडे, अमोल प्रभाकर चोपडे, प्रकाश काशिराम चोपडे, सोपान काशिराम चोपडे, विष्णू सोपान चोपडे, शंकर सोपान चोपडे, विनोद रमेश चोपडे, दिलीप रमेश चोपडे, नवृत्ती सोपान चोपडे सर्व रा. ढोरपगाव या अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Molestation of woman by stone pelting at home