शहरात दोन विवाहीतेचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 20:48 IST2017-09-27T20:47:00+5:302017-09-27T20:48:33+5:30
अकोला - शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशन व जुने शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परिसरात एका ३२ वर्षीय व ३६ वर्षीय विवाहीतेचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

शहरात दोन विवाहीतेचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला - शहरातील रामदास पेठ पोलिस स्टेशन व जुने शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परिसरात एका ३२ वर्षीय व ३६ वर्षीय विवाहीतेचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
जुने शहरातील रहिवासी ३२ वर्षीय विवाहीतेचा गजानन रोकडे नामक इसमाने मंगळवारी रात्री उशीरा विनयभंग केला. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी विवाहीतेच्या तक्रारीवरुन कलम ३५४ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे, तर रामदास पेठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एका ३६ वर्षीय विवाहीतेचा एका अज्ञात इसमाने विनयभंग केला, या प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.