मैत्रिणीचा विनयभंग, युवकास पाच वर्ष सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2022 18:02 IST2022-07-21T18:02:09+5:302022-07-21T18:02:18+5:30
Molestation of girl : आरोपीने मुलीला रस्त्यात अडविले आणि बाहेर फिरायला चालण्यास सांगितले.

मैत्रिणीचा विनयभंग, युवकास पाच वर्ष सश्रम कारावास
अकोला: शाळेत जाणाऱ्या १६ वर्षीय मैत्रिणीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करणाऱ्या युवकास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश(विशेष) व्ही.डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावास व २५ हजार ५०० रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली.
१६ वर्षीय मुलीने १६ नोव्हेंबर २०१९ रोजी खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी आश्रय चंद्रकांत काळे(२२) व तिची ओळख होती. आम्ही दोघेही एकमेकांच्या संपर्कात होतो. एक दिवस शाळेत जात असताना, आरोपीने मुलीला रस्त्यात अडविले आणि बाहेर फिरायला चालण्यास सांगितले. परंतु मुलीने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या युवकाने मुलीसोबत अश्लिल संवाद साधून आणि विनयभंग केला. ही बाब मुलीने कुटूंबियांना सांगितली. मुलीने युवकाविरूद्ध खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ अ, ३५४ ड, ३४१ व पॉक्सो कायदा कलम ७-८ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी आश्रय चंद्रकांत काळे याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून असभ्य वर्तन केल्याच्या आरोपाखाली न्यायालयाने त्याला दोषी ठरविण्यात आले. या प्रकरणात सरकारतर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले.आरोपीला सर्व शिक्षा एकत्रित भोगाव्या लागणार आहे. एपीआय संजय गवई यांनी या प्रकरणाचा तपास केला. सरकार तर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता किरण खोत यांनी बाजू मांडली. हेड कॉन्स्टेबल कान्हेरकर व सीएमएसचे प्रवीण पाटील यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.