अल्पवयीन मुलीचा विनयभंग;  आरोपीची निर्दोष सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 13:50 IST2018-05-09T13:50:58+5:302018-05-09T13:50:58+5:30

अकोला - अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंगाचा आरोप असलेल्या गुन्ह्यातील युवकाची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला.

Molestation of minor girl; Acquitted of the accused | अल्पवयीन मुलीचा विनयभंग;  आरोपीची निर्दोष सुटका

अल्पवयीन मुलीचा विनयभंग;  आरोपीची निर्दोष सुटका

ठळक मुद्देसोनू संतोष बोराडे रा. भीमचौक अकोटफैल असे निर्दोष करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.सिव्हिल लाइन्स पोलिसांनी सोनू संतोष बोराडे विरुद्ध ३५४ अ(२), ड(2), पोस्को ७,८ नुसार गुन्हा दाखल केला होता.दोन्ही पक्षाची बाजू ऐकून न्यायालयाने आरोपीला दोषमुक्त करून त्याची निर्दोष सुटका केली.

अकोला - अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंगाचा आरोप असलेल्या गुन्ह्यातील युवकाची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी हा निकाल दिला. सोनू संतोष बोराडे रा. भीमचौक अकोटफैल असे निर्दोष करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी सोनू संतोष बोराडे विरुद्ध ३५४ अ(२), ड(2), पोस्को ७,८ नुसार गुन्हा दाखल केला होता. आरोपीवर आरोप होता की, त्याने पीडितेच्या जठारपेठस्थित असलेल्या घरात ४ जून २०१४ रोजी घूसून तिच्या आईसमोर विनयभंग केला होता व मुझे तुझसे कोन जुदा कर सकता है, असा फिल्मी डॉयलॉग केला होता. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सरकारपक्षाने सहा साक्षीदार तपासले. एकही साक्षीदार फितूर झाला नाही. आरोपी पक्षातर्फे अ‍ॅड. अनिल पाटील यांनी युक्तीवाद केला होता. दोन्ही पक्षाची बाजू ऐकून न्यायालयाने आरोपीला दोषमुक्त करून त्याची निर्दोष सुटका केली. पोस्को प्रकरणातील आरोपी निर्दोष झाल्याचा हा दुर्मिळ निकाल आहे.

Web Title: Molestation of minor girl; Acquitted of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.