शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेमध्ये मुलीचा विनयभंग; अकोल्याच्या व्यापा-यास अटक

By admin | Updated: January 28, 2017 02:05 IST

व्यापा-याची केली यथेच्छ धुलाई; जामिनावर झाली सुटका.

शेगाव, दि. २७ मुंबईकडे जाणार्‍या विदर्भ एक्स्प्रेसमधील वातानुकूलित बोगीमध्ये अकोल्यातील ५१ वर्षीय व्यापार्‍याने १२ वर्षीय मुलीचा मद्यधुंद अवस्थेत विनयभंग केल्याची घटना २४ जानेवारीच्या रात्री अकोला-शेगाव दरम्यानच्या प्रवासात घडली. या प्रकरणात सदर व्यापार्‍याची यथेच्छ धुलाई करण्यात आली. यानंतर आरोपीविरुद्ध पास्को कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.अमरावती येथील एक कपडा व्यावसायिक आपल्या १२ वर्षीय मुलीसह कुटुंबीयांसोबत हावडा मुंबई एक्स्प्रेसमधून ठाण्याला जाण्यासाठी प्रवास करीत होते. यावेळी अकोला येथून महेश सुरेश केडिया या बोगीमध्ये चढले. दरम्यान, शेगाव रेल्वेस्थानक क्रॉस झाल्यानंतर सदर इसमाने १२ वर्षीय मुलीला ईल इशारे करीत तिची छेडखानी केली. सदर प्रकार मुलीने आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांसह प्रवाशांनी मद्यधुंद असलेल्या महेश केडिया या इसमाला चोप दिला. रात्री ११ च्या सुमारास विदर्भ एक्स्प्रेस भुसावळ रेल्वेस्थानकावर पोहोचताच पोलिसांनी आरोपी केडिया याला गाडीतून ताब्यात घेतले. सदर प्रकरणी मुलीच्या वडिलांनी आरोपी दिलेल्या तक्रारीवरून कलम ३५४ (अ), ५0९ भादंविसह मुंबई दारूबंदी कायदा कलम ८५ (१), आणि बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २0१२ अन्वये कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटना ही शेगाव रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडल्याने आरोपीला शेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. शेगाव पोलिसांनी आरोपीला २५ जानेवारी रोजी खामगावच्या सत्र न्यायालयासमोर हजार केले असता, आरोपीची जामिनावर सुटका करण्यात आली.