मोहखेड ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST2021-01-13T04:47:09+5:302021-01-13T04:47:09+5:30
मूर्तिजापूर: तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक येता १५ जानेवारीला होत आहे. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने प्रचाराला वेग आहे आहे. २९ ...

मोहखेड ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध
मूर्तिजापूर: तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची निवडणूक येता १५ जानेवारीला होत आहे. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने प्रचाराला वेग आहे आहे. २९ ग्रामपंचायतींपैकी सोनेरी (बपोरी व मोहखेड ग्रामपंचायतीची निवडणूक) अविरोध निश्चित झाले आहे. ज्ञानप्रभा प्रतिष्ठानच्या वतीने भावी ग्रा.पं. सदस्यांचा मोहखेड येथे सत्कार करण्यात आला.
तालुक्यात ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू असून, प्रचाराला वेग आला आहे. तालुक्यातील सोनोरी (बपोरी), आणि मोहखेड ग्रामपंचायत अविरोध निश्चित झाल्या आहेत. मोहखेड चार गावांची गट ग्रामपंचायत आहे, यामध्ये मोहखेड, कमळखेड, बाळापूर (लांडापूर ) आणि कमळणी या गावांचा समावेश आहे. मोहखेड येथे सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत परस्परांविरोधी लढत असली तरी ग्रामपंचायतमध्ये एकत्र येत अविरोध निवडणूक घेण्याची परंपरा कायम ठेवली. यंदाच्या निवडणुकीत मोहखेड येथील राजेंद्र जोगदंड यांना तिसऱ्यांदा निवडून येण्याचा मान मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा व इतर भावी ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार ज्ञानप्रभा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अवधूत ढेरे, समाधान इंगळे यांनी केला. डॉ. प्रदीप घाटे, युवराज जोगदंड, अरविंद दवंडे, भावी ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा लांडे, सविता सुरेश खाडे, कुणाल विकास लांडे, श्रीधर अनिल कांबे, चित्रा प्रकाश बंड, शीतल रवी कांबे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चंद्रशेखर लांडे, सोनाली पंत यांची यावेळी उपस्थित होते. गावविकासाची व चक्राकार पद्धतीने प्रत्येक गावाला सरपंचपदाचा मान दिला जातो. यावर्षी बाळापूर गावाचा मान असल्याने आरक्षणानंतर सरपंचपद दिले जाणार असल्याची माहिती आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाधान इंगळे यांनी केले. (फोटो)