मोबाइल लंपास करणारा गजाआड

By Admin | Updated: September 2, 2016 02:01 IST2016-09-02T02:01:24+5:302016-09-02T02:01:24+5:30

खिशातील सहा हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास; आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक केली.

Mobile traffic junk | मोबाइल लंपास करणारा गजाआड

मोबाइल लंपास करणारा गजाआड

अकोला, दि. १: आकोट फैल रेल्वे पुलावरून जाणार्‍या व्यक्तीचा गुरुवारी दुपारी मोबाइल लंपास करणारा आरोपी नवनाथ एकनाथ आहारे (१९ रा. पूरपीडित कॉलनी) याला आकोट फैल पोलिसांनी तत्काळ अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येईल. मोहता मिलजवळ राहणारे संतोष माणिकराव साखरे (४५) हे आकोट फैल रेल्वे पुलावरून जात असताना, आरोपी नवनाथ आहारे याने त्यांच्या खिशातील सहा हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. साखरे यांनी आकोट फैल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याचा शोध घेतला. पोलिसांनी तातडीने आरोपी नवनाथ आहारे याला अटक करून त्याच्याकडून मोबाइल जप्त केला.

Web Title: Mobile traffic junk