मल्टिप्लेक्समधील महागड्या खाद्यपदार्थ विक्रीविरोधात ‘मनसे’ आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 05:12 PM2018-07-01T17:12:30+5:302018-07-01T17:15:01+5:30

अकोला शहरातील राधाकृष्ण सिनेमा या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहावर रविवारी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धडक दिली.

MNS aggressive against selling expensive food items in multiplexes | मल्टिप्लेक्समधील महागड्या खाद्यपदार्थ विक्रीविरोधात ‘मनसे’ आक्रमक

मल्टिप्लेक्समधील महागड्या खाद्यपदार्थ विक्रीविरोधात ‘मनसे’ आक्रमक

Next
ठळक मुद्दे मुंबई, ठाण्यापाठोपाठ रविवार अकोल्यातही मनसेने मल्टिप्लेक्सविरोधात आंदोलन केले.नियमाची अंमलबजावणी करण्याची सक्त ताकीद मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी मल्टिप्लेक्स प्रशासनाला दिली.यावेळी चित्रपटगृह प्रशासनाने एक दिवसाची मुदत देण्याची विनंती केली.

अकोला : मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थांच्या चढ्या दराने होणारी विक्री आणि बाहेरील खाद्यपदार्थांना असलेल्या बंदीविरोधात न्यायालयाने फटकारल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ने याविरोधात दंड थोपटले आहेत. मुंबई, ठाण्यापाठोपाठ रविवार अकोल्यातही मनसेने मल्टिप्लेक्सविरोधात आंदोलन केले.
अकोला शहरातील राधाकृष्ण सिनेमा या मल्टिप्लेक्स चित्रपटगृहावर रविवारी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी धडक दिली. मल्टीप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ आणि पाण्याची बाटली विक्रीदरांबाबत राज्य शासनाने नियमावली आखून दिली आहे. मात्र, मल्टिप्लेक्स चालकांकडून त्यांना केराची टोपली दाखवण्यात येत असल्याचे सांगत या नियमाची अंमलबजावणी करण्याची सक्त ताकीद मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी मल्टिप्लेक्स प्रशासनाला दिली.
सोमवारपर्यंत खाद्यपदार्थ तसेच शितपेय व खाद्यपदार्थ नियमित किंमतीमध्ये देणे सुरु नाही केले, तर मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल. उद्दभवणाºया परिस्थितीस चित्रपट गृह व्यवस्थापन जबाबदार असेल असा इशारा मनसे पदाधिकाºयांनी दिला. यावेळी चित्रपटगृह प्रशासनाने एक दिवसाची मुदत देण्याची विनंती केली. यावेळी पंकज साबळे,सौरभ भगत,आदित्य दामले ,अरविंद शुक्ल, ललित यावलकर, सतीश फाले, विकास मोळके, दीपक खेतान,चंदू अग्रवाल,आकाश गवळी, राजेश पिंजरकर,भूषण भिरड,गोपाल मुदगल,संजय राजहंस,पंकज चव्हाण,शुभम गावंडे,बाळू ढोले,सारंग भरणे ई उपस्थित होते.

 

Web Title: MNS aggressive against selling expensive food items in multiplexes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.