कारची आॅटोरिक्क्षाला धडक; दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 18:06 IST2019-11-13T16:25:02+5:302019-11-13T18:06:35+5:30
या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पातूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे.

कारची आॅटोरिक्क्षाला धडक; दोन जखमी
शिर्ला (अकोला) : अकोल्याहून वाशिमच्या दिशेने जात असलेल्या कारने पातूर येथील विज उपकेंद्राजवळ एका आॅटोरिक्शाला धडक दिल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांना पातूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
सीजी- १५ -११०० क्रमांकाची कार अकोला येथून वाशिमच्या दिशेने जात होती. या कारने शिर्ला गावातून पातूरकडे जाणाऱ्या आॅटोरिक्क्षाला धडक दिली. यामध्ये आटोरिक्क्षा रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. या अपघातात प्रवाशी देविदास सुर्यभान इंगळे (शिर्ला), प्रमोद तेलगोटे ( समतानगर, पातुर) हे दोघे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर कारच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी जखमींना पातूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले.