आमदार हरीश पिंपळे यांना कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 15:57 IST2021-01-06T14:05:57+5:302021-01-06T15:57:41+5:30
Harish Pimple News आमदार हरिश पिंपळे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

आमदार हरीश पिंपळे यांना कोरोनाची लागण
मूर्तिजापूर : विधानसभेचे आमदार हरीश पिंपळे यांना गत दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याने ६ जानेवारी रोजी त्यांनी आपली येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात कोरोना तपासणी करुन घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. गत तीन दिवसांपासून आपल्या घरातच असलेले आमदार हरीश पिंपळे यांना कोरोना झाल्याची लक्षणे वाटत असल्याने त्यांनी आपली येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात तातडीने रॅपिड अॅन्टीजन चाचणी करुन घेतली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुढील उपचारासाठी त्यांनी अकोला सर्वोपचार रुग्णालय गाठले असून, डाक्टरांच्या सल्ल्याने विविध चाचण्या करुन त्यांनी दिलेल्या सल्ल्याने प्रमाणे आपण पुढील उपाय करणार असल्याचे त्यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. त्याच बरोबर गत ५-६ दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करुन घेऊन आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
जवळच्या संपर्कातील अनेकांना लागण असण्याची शक्यता
त्यांच्या नित्याने संपर्कात येणारे त्यांचे स्विय सहायक, कार्यालयीन कर्मचारी, कार्यकर्ते व परिवारातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता बळावली आहे. याची काळजी घेत सर्वच जवळच्या संपर्कातील व्यक्तींनी आपली कोरोना चाचणी करुन घेतली असून त्याचे अहवाल दोन दिवसात प्राप्त होण्याची शक्यता आहे.