मतदारांच्या सोईसाठी 'मिशन अकोला विकास' पोर्टल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 16:49 IST2019-04-05T16:48:53+5:302019-04-05T16:49:21+5:30
मिशन अकोला विकास पोर्टल गुरुवारपासून मतदारांच्या सेवेत उपलब्ध झाले असल्याचे माजी महापौर मदन भरगड यांनी पत्रपरिषदेत सांगितले .

मतदारांच्या सोईसाठी 'मिशन अकोला विकास' पोर्टल
अकोला: अकोला पश्चिम विधासभेच्या मतदारांना आपले नाव, मतदान केंद्र मतदार यादि मधून शोधने सोईचे व्हावे या करिता तसेच मतदानाची टक्केवारी वाढावी हा उद्देश् डोळ्या समोर ठेवून मिशन अकोला विकास पोर्टल गुरुवारपासून मतदारांच्या सेवेत उपलब्ध झाले असल्याचे माजी महापौर मदन भरगड यांनी पत्रपरिषदेत सांगितले . मिशन अकोला विकास पोर्टलच्या लिंक वर क्लिक करून मतदारांने आपला नाव ,मतदार क्रमांक आपल्या मोबाइल वर आॅनलाइन टाकावा त्यानंतर लगेचच त्यांना मतदान केंद्राची सम्पूर्ण महितीसह वोटर स्लिप मोबाइल वरच घरबसल्या उपलब्ध होणार आहे . स्मार्टफोन नसलेल्या; परंतु साधे मोबाइल फोन असलेल्यांनी आपला वोटर आईडी क्रमांक टाईप करून ९०२१७०६००१ या क्रमांकावर मैसेज पाठवावा. त्यांना लगेच मोबाईल वर वोटर स्लिप उपलब्ध होणार आहे. या सुविधेचा लाभ नागरिकांनी जास्तीत जास्त घ्यावे अशी विनंती या वेळी मदन भरगड यांनी केली.