बेपत्ता विद्यार्थी मूर्तिजापुरात मिळाले

By Admin | Updated: January 1, 2017 01:57 IST2017-01-01T01:57:39+5:302017-01-01T01:57:39+5:30

मोठी उमरीतील टिळक राष्ट्रीय सरस्वती शाळेतून गुरुवारी दोन विद्यार्थी बेपत्ता झाले होते.

The missing students got the statue | बेपत्ता विद्यार्थी मूर्तिजापुरात मिळाले

बेपत्ता विद्यार्थी मूर्तिजापुरात मिळाले

अकोला, दि. ३१- मोठी उमरीतील टिळक राष्ट्रीय सरस्वती शाळेतून गुरुवारी सकाळी निघून गेलेले वैभव मनवरे आणि रितेश पाचकवडे हे दोघे शनिवारी दुपारी मूर्तिजापूर येथे मिळून आले.
वैभव व रितेश गुरुवारी शाळेत जात असल्याचे सांगून रेल्वे स्टेशनवर गेले. तेथून रेल्वेगाडीने ते अमरावतीला गेले.
एका नातेवाइकाकडे थांबल्यावर शनिवारी ते मूर्तिजापूरला परतले. दोघाही विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
पाच लीटर गावठी दारू जप्त
मरगट परिसरातील संजय नगरात राहणारी तुकडीबाई हसन लंगे (६६) हिच्या घरी रामदासपेठ पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा घालून, तिच्याकडील कॅनमध्ये भरलेली पाच लीटर गावठी दारू जप्त केली. तिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

Web Title: The missing students got the statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.