तोंडावर तेजाब फेकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

By Admin | Updated: November 8, 2014 00:16 IST2014-11-08T00:16:45+5:302014-11-08T00:16:45+5:30

अकोल्यातील घटना, आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल.

Minor girl molestation threatened with throwing acid on her face | तोंडावर तेजाब फेकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

तोंडावर तेजाब फेकण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अकोला : तोंडावर तेजाब फेकण्याची व वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी शुक्रवारी रात्री कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. लाल बंगला परिसरात राहणार्‍या १७ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती व तिची १५ वर्षीय बहीण मिठी बावडी मदरशामध्ये जात असताना, शुक्रवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास अजमेरी चक्कीजवळ मुन्ना डॉन नामक आरोपी त्यांच्याजवळ आला आणि त्याने तुझ्या वडिलांना जीवे मारेल आणि तुमच्या तोंडावर तेजाब फेकेल, अशी धमकी दिली. घाबरल्यामुळे या दोघी बहिणी पुढे जाऊ लागल्या तेव्हा आरोपी मुन्ना डॉन याने त्यांचा पाठलाग केला. या प्रकरणाची तक्रार देण्यासाठी दोघी बहिणी कोतवाली पोलिस ठाण्यात जाण्यासाठी निघाल्यावर पुन्हा मुन्ना डॉन याने त्यांना गाठून पुन्हा धमकी दिली. या प्रकरणी मुलीच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४ व बाल संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Minor girl molestation threatened with throwing acid on her face