अश्लील वेबसाईटसच्या आहारी अल्पवयीन मुलं

By Admin | Updated: June 26, 2014 02:04 IST2014-06-26T02:03:43+5:302014-06-26T02:04:10+5:30

अकोला, बुलडाणा वाशिम जिल्ह्यांतील सर्व्हेतून मिळाली धक्कादायक माहिती.

Minor children under the age of pornographic websites | अश्लील वेबसाईटसच्या आहारी अल्पवयीन मुलं

अश्लील वेबसाईटसच्या आहारी अल्पवयीन मुलं

अकोला : आपली अल्पवयीन मुले-मुली स्मार्टफोनचा वापर करीत असतील, तर सावधानता बाळगा. कारण, ते पोर्न वेबसाईटस्च्या आहारी तर गेले नाहीत ना, याची खात्री करून घ्या. १0 ते १८ वयोगटातील ७३ टक्के मुले-मुली अश्लील फोटो व व्हिडिओ क्लिपची देवाण- घेवाण करीत असल्याचे कबूल केले. एवढेच नव्हे तर अन्य मित्र- मैत्रिणींशी ईलतेवर चॅटिंग केल्याचेही त्यांनी सांगितले. ही धक्कादायक माहिती, ह्यलोकम तह्णने अकोला, बुलडाणा व वाशिम या तिन्ही जिल्ह्यात केलेल्या सर्वेक्षणातून उजेडात आली आहे. इंटरनेटच्या मायाजालात अल्पवयीनांचे बालमन हरवत असल्याचे सिद्ध झाले आहे.
ह्यमोबाईल आणि इंटरनेटचा वापर आणि किशोरवयीन बालकेह्ण हा सर्वेक्षणाचा विषय होता. यात पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यात १0 ते १९ वर्षापर्यंतच्या अल्पवयीनांचा सर्व्हे करण्यात आला. यात १0 ते १४ वर्षे वयोगटातील १२५ तर १५ ते १९ वर्षे वयोगटातील १११ व १९ वर्षांवरील ६४ जणांचा समावेश होता. यात १0९ मुली व १९१ मुलांना सहभागी करण्यात आले. ९५ मुला- मुलींनी वयाच्या १0 वर्षां पासून, तर २0५ जणांनी वयाच्या १५ व्या वर्षांपासून मोबाईल, इंटरनेट वापरण्यास सुरुवात केली. ७३ टक्के मुला- मुलींनी सांगितले की, त्यांना ओळखीच्या व काहीवेळा अनोळखी व्यक्तीकडून अश्लील एसएमएस, एमएमएस प्राप्त झाले आहेत. ३२.३३ टक्के जण इंटरनेटचा वापर गाणे, गेम, व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी करीत आहेत. १७.३३ टक्के म्हणाले की, शाळेचा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी इंटरनेटचा वापर करीत आहेत, तर २८.३३ टक्के जण चॅटिंग करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. त्यातही ५१ टक्के मुले- मुली सोशल नेटवर्किंग साईटचा वापर करीत आहेत. ध क्कादायक बाब म्हणजे यातील ७३ टक्के मुला- मुलींना अश्लील फोटो, व्हिडिओ क्लिप प्राप्त झाले ते त्यांनी आपल्या मित्र- मैत्रिणींनाही पाठविले. एवढेच नव्हे तर त्यांनी पोर्न वेबसाईट पाहिल्याची कबुली दिली. ५५.६६ टक्के अल्पवयीन दररोज नियमितपणे इंटरनेटचा वापर करीत आहेत. बहुतांश जण आपल्या पालकांच्या अनुपस्थितीत इंटरनेटचा वापर करीत असल्याचेही सर्वेक्षणातून समोर आले. सर्वेक्षणातून अशी माहिती मिळाली की, गंमत म्हणून अनेकांच्या हातात आपल्या आई- वडिलांनी मोबाईल दिला. काही मुले तर पोर्न फिल्मच्या आहारी गेले आहेत. एवढेच नव्हे तर दिवसातून एकदातरी नवीन फिल्म बघितल्याशिवाय या मुलांची अस्वस्थता थांबत नाही. पालकांनी आपल्या मुलांच्या हातात मोबाईल द्यावा; पण आपल्यासमोर तो हातळावा, अशी सक्ती करा, असे तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे.

Web Title: Minor children under the age of pornographic websites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.