अल्पवयीन मुलांनी फोडले चोहोट्टा बाजार येथील प्रतिष्ठान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 18:23 IST2019-10-01T18:23:24+5:302019-10-01T18:23:45+5:30
तीनही मुले अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधार गृहात पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

अल्पवयीन मुलांनी फोडले चोहोट्टा बाजार येथील प्रतिष्ठान
अकोला - चोहोटा बाजार येथील प्रतिष्ठान व घरांमध्ये चोरी करणाऱ्या तीन अल्पवयीन चोरटयांना अटक करण्यात स्थानीक गुन्हे शाखेला यश आले आहे. यामध्ये एक मुलगा हा दुकानामध्येच काम करणारा असल्याची माहिती पुढे आली असून तीनही मुले अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधार गृहात पाठविण्यात आल्याची माहिती आहे.
चोहोट्टा बाजार येथील तीन दुकानामध्ये अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याची माहिती रविवारी समोर आल्यानंतर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा देउन ठाणेदार कात्रे यांच्या गळयात हार घालुन गांधीगीरी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. व्यवसायिकांचा आक्रोश पाहता ठाणेदार यानी घटनेची महिती अकोटचे उपविभागीय अधिकारी सुनील सोनवणे याना घटनास्थळी बोलावून घेतले होते. तसेच या घटनेची माहिती मिलताच आमदार रणधीर सावरकर यांनी सुद्धा घटनास्थळी पोहचून व्यवसायिकांची भेट घेतली होती. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास स्थानीक गुन्हे शाखेकडे दिल्यानंतर स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैलेष सपक ाळ यांनी तातडीने तपास करून या चोरीतील तीन अल्पवयीन चोरटयांना अटक केली. या तीन चोरटयांकडून सहा मोबाईल कॅमेरा व रोखरक्कम जप्त करण्यात आली आहे. मात्र याच गावातील महेंद्र कबाडे यांच्या घरून चोरट्यांनी 3 लाख 50 हजार रुपयांच्या येवज लंपास केला असून या चोरीचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमूख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैलेष सपकाळ, शक्ती कांबळे, मंगेश मदनकार, अस्लम व कर्मचाºयांनी केली.