बाल निरीक्षण गृहातून अल्पवयीन मुले पसार

By Admin | Updated: July 4, 2017 20:28 IST2017-07-04T20:28:35+5:302017-07-04T20:28:35+5:30

दोन अल्पवयीन मुले काही महिन्यांपूर्वी गोरक्षण रोडवरील शासकीय बाल निरीक्षण गृहात दाखल झाली होती. ही दोन्ही मुले सोमवारी दुपारी निरीक्षण गृहातून पसार झाली.

Minor children escaped from child inspection house | बाल निरीक्षण गृहातून अल्पवयीन मुले पसार

बाल निरीक्षण गृहातून अल्पवयीन मुले पसार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : चोरीच्या गुन्ह्यात आरोपी असलेली दोन अल्पवयीन मुले काही महिन्यांपूर्वी बाल न्यायमंडळामार्फत गोरक्षण रोडवरील शासकीय बाल निरीक्षण गृहात दाखल झाली होती. ही दोन्ही मुले सोमवारी दुपारी बाल निरीक्षण गृहात पसार झाली. याप्रकरणी खदान पोलिसांनी नोंद केली. निरीक्षण गृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बस स्टँड, रेल्वे स्टेशन परिसरात त्यांचा शोध घेतला; परंतु ही मुले मिळून आली नाहीत. बाल निरीक्षण गृहातील कनिष्ठ काळजी वाहक प्रमिला सुनील पाटील यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.

Web Title: Minor children escaped from child inspection house