रक्तदान शिबिराला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:16 IST2021-04-26T04:16:59+5:302021-04-26T04:16:59+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, रक्त साठ्याची गरज असल्याने, बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी रविवारी अकोला येथील ...

Minister of State for Energy Prajakt Tanpure visits blood donation camp | रक्तदान शिबिराला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट

रक्तदान शिबिराला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, रक्त साठ्याची गरज असल्याने, बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम सिरस्कार यांनी रविवारी अकोला येथील टॉवर चौकातील कार्यालयात अकोला रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सदर रक्तदान शिबिराला ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवा मोहोड, डॉ. आशा मिरगे, विजय अंभोरे, परिमल लहाने, अर्चना थोरात, करण दोड, राजू बोचे, दिनकर वाघ, सुनीता राठोड, सागर कढोणे, हरिभाऊ जावरकर, श्रीराम ताले, विजय चव्हाण, आरोग्य अधिकारी कुंदन चव्हाण, कल्पना सोनाळे, गोविंद पंचांग, मोहम्मद मुशिर, अक्षय इंगोले आदींची उपस्थिती होती.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्याकरिता धनंजय सिरस्कार, संजय मुळे, दिलीप क्षीरसागर, राजेश असलमोल, राजू राखोंडे, फैजान भाई, अक्षय इंदोरे, सुनील बंड, भूषण करांगळे, शुभम बोदडे, सुनील तायडे, सचिन धनोकार, प्रशांत बोचरे, धीरज आंगरे, अनिल मसने, गजानन केदार आदींनी परिश्रम घेतले. (वा.प्र.)

फोटाे:

Web Title: Minister of State for Energy Prajakt Tanpure visits blood donation camp