मिनी ट्रक उलटला; २१ भाविक जखमी

By Admin | Updated: November 21, 2014 02:13 IST2014-11-21T02:13:36+5:302014-11-21T02:13:36+5:30

पोपटखेडच्या गजानन महाराज विहिरीनजीकची घटना

Mini truck reversed; 21 pilgrims injured | मिनी ट्रक उलटला; २१ भाविक जखमी

मिनी ट्रक उलटला; २१ भाविक जखमी

आकोट : पोपटखेडजवळील श्रीसंत गजानन महाराज विहीर संस्थान अमृततीर्थ येथून दर्शन घेऊन सेवाधारी भाविकांना परत घेऊन येणारा मिनी ट्रक तेथून जवळच उलटून अपघात झाला. यामध्ये २१ भाविक जखमी झाले असून, त्यांच्यावर आकोट येथे प्राथमिक उपचार करून अकोला येथे रवाना करण्यात आले आहे. ही घटना २0 नोव्हेंबरला दुपारी ४ वाजताच्या दरम्यान घडली.
चोहोट्टा बाजारनजीकच्या करतवाडी येथील भाविक बुधवारपासून गजानन महाराज विहिरीवर सेवा देण्याकरिता व दर्शनाकरिता आले होते. गुरुवारी दर्शन करून परत येत असताना पोपटखेड धरणासमोरील नदीवर असलेल्या पुलावरून येणार्‍या टाटा सुमो गाडीला बाजू देत असताना एमएच १९ एम १२४८ क्रमांकाचा मिनी ट्रक उलटला. या ट्रकमधील २१ भाविक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये करतवाडी येथील शोभा रायबोले, अमोल किरडे, लक्ष्मी किरडे, शशिकला पेठे, सुचित्रा पेठे, रामरतन पेठे, मंगेश किरडे, अजय किरडे, मोहन राणे, उमेश किरडे, भास्कर सुरळकर, वैष्णवी किरडे, मालती सुरळकर, सौरभ किरडे, ओम किरडे, मीना किरडे, पल्लवी किरडे, चंद्रकला पेठे, डिगांबर किरडे, डिगांबर पेठे व रंजना लांडे यांचा समावेश आहे.
जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती पोलिस व ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने दिली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात योगेश नाठे व त्यांच्या सहकारी मित्रांनी मदत केली.
याबाबतची माहिती आकोट ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी रुग्णालयात व घटनास्थळावर धाव घेतली होती. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी पोलिस कारवाई सुरू होती.

Web Title: Mini truck reversed; 21 pilgrims injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.