‘एमआयएम’ची लवकरच धडक !

By Admin | Updated: August 20, 2014 00:22 IST2014-08-20T00:22:42+5:302014-08-20T00:22:42+5:30

कॉँग्रेसला धोका : अल्पसंख्याक मतांच्या विभाजनाची शक्यता

MIM's soon to be hit! | ‘एमआयएम’ची लवकरच धडक !

‘एमआयएम’ची लवकरच धडक !

अकोला: विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाच्या मतांसाठी सर्वच राजकीय पक्षांची चढाओढ सुरु असताना, आता हैद्राबाद येथील मजलिस-ए-एतिहाद अल मुसलिमिन अर्थात एमआयएम विदर्भात धडक देण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. बुलडाण्यापाठोपाठ आता अकोल्यातही या पक्षाची शाखा लवकरच स्थापन होणार आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांच्या मतांवर डोळा ठेवून राजकारण करणार्‍या पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. अल्पसंख्याक मतांचा निर्णायक गठ्ठा असलेल्या अकोल्यात एमआयएमची धडक ही काही पक्षांच्या मुळावर, तर काहींच्या पथ्यावर पडणार आहे.
राज्यात अल्पसंख्याक समाजाची निर्णायक मते आहेत. त्यामुळेच राज्य शासनाने मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा निकाली काढला. अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघांमध्येही अल्पसंख्याक समाजाची मते कमी नाहीत. त्यामुळेच एमआयएमने यंदा महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ३५ ते ४0 टक्के मुस्लिम मतदार असलेल्या मतदारसंघांवर एमआयएम लक्ष केंद्रित करणार आहे. त्यानुसार अकोल्यातील बाळापूर, आकोट आणि अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघांमध्ये मुस्लिम समाजाची मते निर्णायक आहेत. त्यामुळे अकोल्यात शाखा स्थापन केल्यानंतर हा पक्ष निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे.

Web Title: MIM's soon to be hit!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.