चिमुकलीचा विनयभंग, आरोपी गजाआड

By Admin | Updated: November 8, 2014 00:04 IST2014-11-08T00:04:14+5:302014-11-08T00:04:14+5:30

रामदास पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

Mimicry of Chimukali, accused GajaAad | चिमुकलीचा विनयभंग, आरोपी गजाआड

चिमुकलीचा विनयभंग, आरोपी गजाआड

अकोला : पतंग दाखविण्याचा बहाणा करून चिमुकल्या मुलीस गच्चीवर नेऊन तिच्यासोबत अश्लील चाळे करणार्‍या युवकाविरुद्ध गुरुवारी उशिरा रात्री रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला व त्याला गजाआड केले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी त्यांच्याशी परिचित दुर्गा चौकातील हर्ष परेश कारिया (१९) हा घरी आला आणि त्यांच्या सहा वर्षीय मुलीस पतंग दाखविण्याच्या बहाण्याने गच्चीवर घेऊन गेला. या ठिकाणी तो मुलीसोबत अश्लील चाळे करीत असल्याचे आढळले. तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी हर्ष कारिया याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

Web Title: Mimicry of Chimukali, accused GajaAad