शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

छत्रपती शिवरायांचा असाही एक मावळा! नागपूर ते शिवनेरी दुचाकी प्रवास करतोय मिलिंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:32 IST

अकोला: बाइकवर फिरण्याची आवड तर सगळ्यांनाच असते. काहीजण महिन्याअखेरीस जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देतात, तर काही अधूनमधून ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात; मात्र काहीजण आपल्या भ्रमंतीसाठी, बाइक सवारीच्या आवडीसाठी जगभर फिरण्याची आकांक्षा मनी बाळगतात. मिलिंद धनराज मेश्राम त्यापैकीच एक. मिलिंद हा शिवछत्रपतींच्या विचारांना आणि त्यांना आदर्श मानणारा युवक. शिवजयंती साजरी करण्यासाठी तो नागपूरहून थेट दुचाकीने शिवनेरी गडाकडे निघाला आणि तेथून तो लखनऊला निघेल. 

ठळक मुद्देशिवनेरी-लखनऊ शिवयात्रा

नितीन गव्हाळे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बाइकवर फिरण्याची आवड तर सगळ्यांनाच असते. काहीजण महिन्याअखेरीस जवळपासच्या निसर्गरम्य ठिकाणी भेट देतात, तर काही अधूनमधून ऐतिहासिक स्थळांना भेटी देतात; मात्र काहीजण आपल्या भ्रमंतीसाठी, बाइक सवारीच्या आवडीसाठी जगभर फिरण्याची आकांक्षा मनी बाळगतात. मिलिंद धनराज मेश्राम त्यापैकीच एक. मिलिंद हा शिवछत्रपतींच्या विचारांना आणि त्यांना आदर्श मानणारा युवक. शिवजयंती साजरी करण्यासाठी तो नागपूरहून थेट दुचाकीने शिवनेरी गडाकडे निघाला आणि तेथून तो लखनऊला निघेल. नागपूरहून निघालेला मिलिंद मेश्राम रविवारी शिवनेरीला जाण्यासाठी काही वेळ अकोल्यात थांबला होता. यावेळी त्याने ‘लोकमत’शी संवाद साधला आणि बाइक सवारीविषयी त्याने माहिती दिली. मिलिंदने आपल्या बाइकवर आतापर्यंत सव्वा लाख किलोमीटर प्रवास केला असून, लेह, लड्डाखसह, पानिपत, उत्तर व दक्षिण भारत दुचाकीवर पालथा घातला आहे. वर्षातील दोन महिने नुसते बाइकवर फिरण्यासाठी तो राखीव ठेवतो. मिलिंद हा नागपूर शहरात एक रेस्टॉरंट चालवितो. मिलिंदला लहानपणापासून भटकंतीचे वेड. तारुण्यात हातात दुचाकी आली आणि त्याच्या आवडीला वेगाचे पंख मिळाले. गेली दोन दशके मिलिंद मेश्राम याची बाइक सफर अव्याहत सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणार्‍यांपैकी एक असलेला मिलिंद..शिवरायांच्या गडकिल्ल्यांची भ्रमंतीसुद्धा त्याने बाइकवरच पूर्ण केली. छत्रपती शिवरायांचा कुठेही कार्यक्रम असो मिलिंद बाइकसह त्या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी होतो. १९ फेब्रुवारी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवनेरीवर शिवजयंती जल्लोषात साजरी होते. शिवनेरीवर होणार्‍या शिवजयंती सोहळय़ात सहभागी होण्यासाठी मिलिंद हा नागपूरपासून ७0१ किमी अंतरावर असलेल्या शिवनेरी गडावर बाइकवर निघाला. 

शिवजयंतीसाठी लखनऊला जाणार!उत्तर प्रदेश मराठा समाजाच्यावतीने शिवनेरी किल्ला ते लखनऊपर्यंत अशी १४५७ किमीची बाइक रॅली काढण्यात येणार आहे. १३ फेब्रुवारी रोजी ही बाइक रॅली शिवनेरीवरून निघणार आहेत. ही रॅली १९ फेब्रुवारी रोजी लखनऊला पोहोचेल. या बाइक रॅलीमध्येसुद्धा मिलिंद मेश्राम सहभागी होणार आहे. या रॅलीमध्ये महाराष्ट्रातील एकूण १७0 युवक सहभागी होणार आहेत. लखनऊ येथे मोठय़ा उत्साहामध्ये शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे.  

टॅग्स :Travelप्रवासtwo wheelerटू व्हीलरnagpurनागपूरShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज