कुरूम येथील मायलेकाचा मध्य प्रदेशात अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST2021-02-06T04:32:24+5:302021-02-06T04:32:24+5:30
कुरूम येथील रहिवासी जितेंद्र पांडुरंग सुसतकर (२६) व त्याची आई लता पांडुरंग सुसतकर (४८) हे दोघे मायलेक २ फेब्रुवारीला ...

कुरूम येथील मायलेकाचा मध्य प्रदेशात अपघात
कुरूम येथील रहिवासी जितेंद्र पांडुरंग सुसतकर (२६) व त्याची आई लता पांडुरंग सुसतकर (४८) हे दोघे मायलेक २ फेब्रुवारीला एमएच ३० एयू ५१८० क्रमांकाच्या दुचाकीने देवदर्शनासाठी ओंकारेश्वर येथे गेले होते. देवदर्शन आटोपून ४ फेब्रुवारीला मध्य प्रदेशच्या खंडवा जिल्ह्यातील छैगाव माखन येथे एमपी ११-१७७७ क्रमांकाच्या बसगाडीने त्यांच्या दुचाकीस धडक दिली. यात दुचाकीस्वार जितेंद्र सुसतकर हा गंभीर जखमी झाला तर त्याची आई लता पांडुरंग सुसतकर हिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच छैगाव माखन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघातात गंभीर जखमी जितेंद्र सुसतकरला खंडवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. लता सुसतकर हिचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा रुग्णालयात हलविला. आरोपी बसचालकाविरुद्ध पोलीस स्टेशन छैगाव माखन, जि. खंडवा येथे गुन्हा दाखल केला.