एमआयडीसीच्या ‘वे-ब्रिज’ची होणार अकस्मात तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 13:28 IST2018-12-10T13:27:59+5:302018-12-10T13:28:16+5:30
अकोला : स्थानिक एमआयडीसी परिसरात वे-ब्रिजच्या वजनात तफावत आढळत असल्याच्या तक्रारी वाढल्याने वैधमापनशास्त्र विभागाच्यावतीने तपासणी मोहीम तीव्र होणार आहे.

एमआयडीसीच्या ‘वे-ब्रिज’ची होणार अकस्मात तपासणी!
अकोला : स्थानिक एमआयडीसी परिसरात वे-ब्रिजच्या वजनात तफावत आढळत असल्याच्या तक्रारी वाढल्याने वैधमापनशास्त्र विभागाच्यावतीने तपासणी मोहीम तीव्र होणार आहे. अकस्मात भेट देऊन ही पाहणी केली जाणार असल्याचे निरीक्षक ज्ञानदेव सिमरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
अकोला डिस्ट्रिक्ट ट्रक ओनर्स वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी यांनी एमआयडीसीतील वे-ब्रिजवरील काट्यावर संशय व्यक्त केला होता. दोन वे-ब्रिजमधील वजन-मापाचे दाखले देत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची उशिरा का होईना, वैधमापनशास्त्र विभागाने दखल घेऊन चौकशी सुरू केली. अग्रवाल आणि इतर वे-ब्रिजमध्ये मोठी तफावत आढळल्याने अग्रवाल वे-ब्रिजवर कारवाई करण्यात आली. सुधीर कॉलनीतील वैधमापनशास्त्र कार्यालयाचे सहायक नियंत्रक यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली; मात्र अनेक वे-ब्रिजचे संचालक व्यापाऱ्यांना लुटत असल्याचे बोलले जात आहे. त्यांना पकडण्यासाठी आता मोहीम तीव्र होत आहे.