महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक अटळः अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 02:45 PM2019-11-23T14:45:37+5:302019-11-23T17:36:40+5:30

विधानसभेची मध्यावधी निवडणूक अटळ असल्याचे मत वचिंत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

 Mid-term election possible - adv. Prakash Ambedkar | महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक अटळः अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक अटळः अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

Next

- राजरत्न सिरसाट

अकोला : राज्याच्या राजकारणातील उलथापालथ ही केवळ सत्तेसाठी असून, हीच स्थिती कायम राहिल्यास विधानसभेची मध्यावधी निवडणूक अटळ असल्याचे मत वचिंत बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ही इतिहासाची पुनरावृत्ती असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

शनिवारी सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकारण अचानक पलटले आहे. याच पार्श्वभूमीवर अ‍ॅड. आंबेडकर यांचे मत जाणून घेतले असता त्यांनी हीच स्थिती कायम राहिल्यास मध्यावधी निवडणुकीच्या दिशेने राज्य वाटचाल करीत असल्याचे सांगताना. ४० वर्षापूर्वी स्व.वसंतदादा पाटील यांच्या बाबतीत जे घडलं म्हणजेच शरद पवारांनी जे पेरले ते आता उगवले. ही इतिहासाची पुर्नरावृत्ती असल्याचे ते म्हणाले. घटनात्मक पेच निर्माण होऊ शकतो का? या बाबत बोलताना त्यांनी राजकीय पक्षाची कार्यकारी समिती ही महत्वाची असून, राजकीय पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंद झालेली असते. विधीमंडळ नेता हा पक्षा सभागृहातील नेता निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांनी जरी निवडला असला तरी अंतिम अधिकार पक्षाकडे असतात असेही त्यांनी सांगितले.

Web Title:  Mid-term election possible - adv. Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.