राज्यात दोन लाखांवर वीजग्राहकांनी स्वत:हून पाठविले मीटर रीडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:33+5:302021-05-07T04:19:33+5:30
प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरच्या ...

राज्यात दोन लाखांवर वीजग्राहकांनी स्वत:हून पाठविले मीटर रीडिंग
प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजजोडणीच्या मीटरचे फोटो रीडिंग घेण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरच्या रीडिंगसाठी दरमहा निश्चित तारखेच्या एक दिवसआधी रीडिंग पाठविण्याची ‘एसएमएस’द्वारे विनंती करण्यात येत आहे. तेव्हापासून चार दिवसांपर्यंत ग्राहकांना स्वतःहून मोबाइल ॲप किंवा ‘एसएमएस’द्वारे मीटरमधील केडब्लूएच रीडिंग पाठविता येते. गेल्या एप्रिल महिन्यात राज्यातील २ लाख २ हजार ७४२ ग्राहकांनी स्वतःहून मीटर रीडिंग पाठविलेले आहे. यात पुणे परिमंडळमधील ४९,९५०, कल्याण- २८,९१६, नाशिक- २२,३३०, भांडूप- १८,०९३, बारामती- १३,७३३, जळगाव- १०,८७७, औरंगाबाद- १०,१००, कोल्हापूर- ८,४७०, नागपूर- ७,२६९, अकोला- ७,१८०, लातूर- ६,०८५, अमरावती- ५,६६२, कोकण- ४,२२३, गोंदिया- ३,४६४, नांदेड- ३,२६२ व चंद्रपूर परिमंडळातील ३,१३८ वीजग्राहकांचा समावेश आहे.