शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

पारा ४४.३ अंशांवर, सकाळपासूनच उन्हाच्या झळा; अकोलेकर त्रस्त, शहरातील मुख्य रस्ते पडले ओस

By रवी दामोदर | Published: May 04, 2024 7:00 PM

यंदाच्या उन्हाळ्यात उष्म्याने कहर केला असून,सकाळपासूनच उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.

अकोला : यंदाच्या उन्हाळ्यात उष्म्याने कहर केला असून,सकाळपासूनच उन्हाच्या झळांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवारी उन्हाचा पारा उच्चांकावर पोहोचला असून, तापमान ४४.३ अंश होते. वाढलेल्या उन्हामुळे भर दुपारी शहरातील मुख्य रस्ते ओस पडल्याचे दिसून आले. गत काही दिवसांपासून तापमानात सतत वाढ होत आहे. पारा चाळीशीकडे गेला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाची दाहकता वाढल्याचे जाणवत आहे. गत पंधरा दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात गारवा निर्माण झाला होता.

दरम्यान, आता पुन्हा उन्हाच्या प्रचंड झळा जाणवू लागल्या आहेत. शनिवारी उन्हाने उच्चांक गाठला असून, तापमान तब्बल ४४.३ अंश होते. डांबरी रस्त्याच्या तुलनेत सिमेंटचा रस्ता उष्णता साठवून ठेवत असल्याने या रस्त्यावरून जाताना झळा अधिक जाणवून येत आहेत. परिणामी उन्हाच्या चटक्यांमुळे प्रवास नकोसा झाला आहे.त्यामुळे भर दुपारी शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. उन्हापासून बचावासाठी दुचाकीस्वार हेल्मेट, स्कार्प, रुमाल बांधूनच बाहेर पडत आहेत. यातूनही घामाघूम होऊन रसवंतीगृह, शीतपेयांची ठिकाणे शोधत आहेत. मागील पाच दिवसांचे तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)वार         -        किमान तापमान    -    कमाल तापमानसोमवार, दि.२९ एप्रिल  -    २८.२      -        ४२.३  मंगळवार, दि.३० एप्रिल  -   २७.५       -       ४३.९  बुधवार, दि.१ मे      -    २६.२       -       ४३.१ गुरुवार, दि.२ मे      -    २४.२       -       ४२.३  शुक्रवार, दि.३ मे     -     २२.५     -        ४३.४  शनिवार, दि.४ मे     -     २३.२        -        ४४.३

टॅग्स :Akolaअकोला