शहरं
Join us  
Trending Stories
1
माझं काम न करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची यादी मी अजितदादांकडे दिली, पण...; श्रीरंग बारणेंचा आरोप
2
Sunita Kejriwal : "अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार; माझे पती जेलमध्ये जाऊ नयेत असं तुम्हाला वाटत असेल तर..."
3
“कुणालाही पाठीशी घालू नका”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी CM एकनाथ शिंदेंचे पोलिसांना निर्देश
4
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
5
लोन घेतलं नाही, पण IDFC Bankनं EMI कापला, आता कोर्टानं ठोठावला मोठा दंड; काय आहे प्रकरण?
6
आकडा कमी होणार, तरीही भाजपला ३०० जागा मिळणार! प्रशांत किशोर यांचा दावा
7
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
8
क्रीम अँड ब्लॅक गाऊन, डायमंड नेकलेस, शॉर्ट हेअरकट; 'देसी गर्ल'चा प्रेमात पाडणारा परदेशी लूक!
9
टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?
10
वडिलांकडे फी भरण्यासाठी नव्हते पैसे, गरिबीत गेलं बालपण; आज आहे 485 कोटींची मालकीण
11
आएगा तो मोदी...! भाजपाला किती जागा मिळणार?; प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी
12
ही दोस्ती तुटायची नाय...! एकत्र केली UPSC तयारी; दोघं IAS तर एक मित्र IPS बनला
13
Veritaas Advertising IPO: लिस्ट होताच शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१४४ चा शेअर पोहोचला ₹२८८ वर; गुंतवणूकदार मालामाल
14
...म्हणूनही मला संघात घेतलं नव्हतं; Gautam Gambhir चा खळबळजनक खुलासा
15
सावधान! RTO ने नियम बदलले, १ जूनपासून लागू होणार नवे रुल्स;...तर भरावा लागेल २५ हजारांचा दंड
16
काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली
17
'आता मी कोणाचाच प्रचार करणार नाही कारण...' अलका कुबल यांनी मांडलं स्पष्ट मत
18
कतरिना कैफही आहे गरोदर? ओव्हरकोट ड्रेसमध्ये दिसला बेबीबंप; नवऱ्यासोबत लंडनमध्ये फेरफटका
19
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
20
'कोर्टाने आमचे दोन्ही अर्ज फेटाळले'; पोलिसांवरील आरोपांनंतर पोलीस आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

पारा ४१ अंशावर; उष्माघातापासून सावध राहण्याचा सल्ला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 1:42 PM

वाशिम : एप्रिल महिन्यापासून जिल्ह्याचा पारा वाढत आहे. सोमवारी जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याने उष्माघाताचा धोकाही वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : एप्रिल महिन्यापासून जिल्ह्याचा पारा वाढत आहे. सोमवारी जिल्ह्याचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, येत्या काही दिवसात तापमान आणखी वाढणार असल्याने उष्माघाताचा धोकाही वाढत आहे. उन्हापासून आरोग्य जपा, असा सल्ला वैद्यकीय अधिकाºयांनी दिला आहे.अंगाची काहिली करणाºया उष्णतेची दाहकता दिवसागणिक कमालीची वाढत आहे. परिणामी, जिल्हाभरात उष्माघाताच्या प्रमाणात वाढ होत असून, जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालये हाउसफुल्ल होत असल्याचे दिसून येते. गत आठवड्यापासून जिल्ह्यात सूर्य आग ओकत आहे. आग ओकणाºया सूर्यामुळे जिल्हावासी होरपळत असून, नागरिकांनी आरोग्य जपावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, चक्कर येणे, भूक न लागणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, अस्वस्थता वाटणे, बेशुद्धावस्था येणे आदी उष्माघाताची लक्षणे असून, अशी लक्षणे आढळून येताच, संबंधित नागरिकांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच तापमान ४१ अंश सेल्सिअसपेक्षा वर पोहोचल्याने आगामी काही दिवसात तापमान ४३ ते ४५ अंश सेल्सिअस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उन्हामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येतो. वाढत्या उन्हाचा परिणाम जलस्रोतावरही होत आहे.  अशी आहेत उष्माघाताची लक्षणेथकवा येणे, अंग तापणे, भूक न लागणे, चक्कर येणे, डोके दुखणे, अस्वस्थ होणे,  अचानक बेशुद्धी येणे, निरूत्साही होणे, रक्तदाब वाढणे, त्वचा कोरडी पडणे. असे करावे प्रतिबंधात्मक उपायवाढत्या उन्हात फार काळ कष्टाची कामे टाळावी, कष्टाची कामे सकाळी, संध्याकाळी अथवा तापमान कमी असेल तेव्हाच उरकावी, उष्णता शोषून घेणारे कपडे (काळे, लाल अथवा भडक रंगाचे) टाळावे, सैल व पांढºया रंगाचे कपडे वापरास प्राधान्य द्यावे, जलसंजिवनीचा वापर करावा, भरपूर पाणी व लिंबु साखर पाणी प्यावे,  घराबाहेर पडताना कान व डोळे पांढºया रूमालाने झाकुन घ्यावे, डोळ्यांच्या संरक्षणासाठी सनगॉगल्स वापरणे, बाहेरून आल्यावर डोळे थंड पाण्याने धुवून घ्यावे. आरोग्यासाठी हे टाळावे..उघड्यावरील पदार्थ खाऊ नये, लहान मुलांना जास्त थंड पदार्थ घेऊन देवू नये, तेलकट मसालेदार पदार्थ खाणे टाळा, उन्हातून आल्याबरोबर थंड हवेत बसू नये, उपाशीपोटी घराबाहेर पडू नये, बाजारु शितपेयांचा अतिरेक टाळावा तसेच शरीराला पाण्याची कमतरता भासू नये म्हणून अधिक पाणी प्यावे, बाहेर फिरताना जवळ पाणी बाळगावे, लहान मुले व वृद्धांची दखल घ्यावी, सुती कापडाचा वापर करावा, फळाचा आहार वाढवावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्यSummer Specialसमर स्पेशलSun strokeउष्माघात