शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या नोटीसमुळे सिंधी कॅम्पमधील इसमाचा हृदयविकाराने मृत्यू !

By admin | Updated: May 16, 2014 00:15 IST

मनपाने केलेल्या कारवाईमुळेच जसवंत केसवाणी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

अकोला - सिंधी कॅम्पमधील कच्ची खोली येथील रहिवासी जसवंत केसवाणी यांचा गुरुवारी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. केसवाणी यांचे राहत्या घराचे बांधकाम सुरू असताना त्यांना बांधकाम अवैध असल्याची नोटीस मनपाने बजावली होती. या नोटीसमुळे ते अस्वस्थ झाले आणि गुरुवारी त्यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मनपाने केलेल्या या कारवाईमुळेच जसवंत केसवाणी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
जसवंत केसवाणी यांचे कच्ची खोली येथे स्वत:चे घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचा व्यवसायाशी कुठलाही संबंध नसताना महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने त्यांना बांधकाम अवैध असल्याची नोटीस देण्यात आली. जसवंत केसवाणी यांनी महानगरपालिकेत जाऊन बांधकामाची सर्व परवानगी असल्याचे तसेच सदर बांधकाम हे व्यावासायिक नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. मात्र तरीही प्रशासनाने ही बाब लक्षात न घेता त्यांना बांधकाम अवैध असल्याची नोटीस देऊन कारवाई करण्याचा इशारा दिला. मनपाच्या या भूमिकेमुळेच ते अस्वस्थ झाले आणि गुरुवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. नातेवाईकांनी केसवाणी यांना तातडीने रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल केले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. मनपा प्रशासनाच्या या नोटीसमुळेच जसवंत केसवाणी यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला असून, या प्रकरणातील संबंधित दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात केसवाणी यांच्या नातेवाईकांनी मनपा प्रशासनाच्या नोटीसमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार खदान पोलिस ठाण्यात करण्याचा निर्णय घेतला असून, गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी ही तक्रार पोलिस ठाण्यात केल्याची माहिती आहे.