पाणीपट्टी वसुलीच्या मुद्यावर गाजली अर्थ समितीची सभा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:16 IST2021-02-05T06:16:23+5:302021-02-05T06:16:23+5:30
अकोला: पाणीपट्टी वसुलीच्या मुद्यावर गुरुवारी जिल्हा परिषद अर्थ समितीची सभा चांगलीच गाजली. समितीच्या सभेला गटविकास अधिकारी(बीडीओ) अनुपस्थित असल्याने ...

पाणीपट्टी वसुलीच्या मुद्यावर गाजली अर्थ समितीची सभा!
अकोला: पाणीपट्टी वसुलीच्या मुद्यावर गुरुवारी जिल्हा परिषद अर्थ समितीची सभा चांगलीच गाजली. समितीच्या सभेला गटविकास अधिकारी(बीडीओ) अनुपस्थित असल्याने समिती सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेचा सर्वात जास्त निधी पाणीपुरवठा विभागावर खर्च करण्यात येत असून, त्या तुलनेत पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण मात्र अत्यल्प असल्याने, या मुद्दयावर समिती सदस्यांनी सभेत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी जिल्हा परिषद पंचायत विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तात्काळ कामाला लागण्याची गरज असून, पाणीपट्टीची थकबाकी वसूल न केल्यास पाणीपुरवठा योजनांवर होत असलेला निधी खर्च करता येणार नसल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश सभेत देण्यात आले. अर्थ समितीच्या सभेला गटविकास अधिकारी उपस्थित नसल्याच्या मुद्यावर सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत, पुढील सभेपासून जिल्ह्यातील गटविकास अधिकारी समितीच्या सभेला उपस्थित राहतील, असे सभेत ठरविण्यात आले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती सावित्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला समती सदस्य पुष्पा इंगळे, विनोद देशमुख, सुनील फाटकर, संगीता अढाऊ, कोमल पेटे, संजय बावणे, वर्षा वझिरे, गायत्री कांबे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विद्या पवार यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पंचायत, पाणीपुरवठा
विभागाच्या कामजावर प्रश्नचिन्ह!
जिल्ह्यात ३० हजार अवैध नळजोडण्या असताना, यासंदर्भात एकही कारवाइ करण्यात आली नसल्याने
समिती सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कालबाह्य होणाऱ्या गोळ्यांच्या
वाटपावर विचारणा!
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना कॅल्शिअम गोळ्यांचे वाटप करण्यात आले असून, त्यामध्ये काही गोळ्यांची मुदत मार्च महिन्यात संपणार आहे, तोपर्यंत गोळ्यांचे वाटप पूर्ण न झाल्यास मार्चनंतर कालबाह्य होणाऱ्या या गोळ्यांचे काय करणार, अशी विचारणा समितीचे सदस्य विनोद देशमुख यांनी सभेत केली.