वैद्यकीय अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांना शिवीगाळ!
By Admin | Updated: May 28, 2017 03:48 IST2017-05-28T03:48:15+5:302017-05-28T03:48:15+5:30
समाधान शिबिरात तक्रार; आठवडी सभेत दारू पिऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ.

वैद्यकीय अधिकाऱ्याची कर्मचाऱ्यांना शिवीगाळ!
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : कर्तव्यावर असणार्या कर्मचार्यांना आठवडी सभेत दारू पिऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणार्या दानापूरच्या वैद्यकीय अधिकार्यांची तक्रार आरोग्य केंद्राच्या कर्मचार्यांनी तालुका आरोग्य अधिकार्यांकडे केली होती; मात्र त्यावर कुठलीही करवाई करण्यात आली नसल्याने त्रस्त कर्मचार्यांनी २८ मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी घेतलेल्या राजस्व समाधान शिबिरात तक्रार केली आहे.
दानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वेते यांनी ३१ मार्च २0१७ ला सकाळी आठवडी सभा बोलविली; परंतु स्वत: सायंकाळी ५ वाजता मद्य प्राशन करून सभेत आले. सभेत कर्मचार्यांसोबत वाद घालून शिवीगाळ केली. एन. एम. इंगळे यांच्या अंगावर धावून दात पाडण्याची धमकी दिली. त्यानंतर नवलकार, शामस्कर, चापके, तारमेकवार, दहीकर आदी कर्मचार्यांसह कंत्राटी कर्मचार्यांनासुद्धा काहीही कारण नसताना मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ केली. तुमच्या वेतनवाढ रोखून इन्क्रीमेंट बाद करण्याची, बडतर्फ करण्याची, सी.आर. खराब करण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार कर्मचारी एन. एम. इंगळे, आर. ई. अलटकार, पी. बी. चापके, ए. बी. तारमेकवार, एम. जे. राऊत, व्ही. एम. कांबळे, एम. व्ही. नवलकार, सुशिला मनीष गावंडे, डी. बी. बरींगे, व्ही. एस. कवळकार, डी. डब्ल्यू मेटांगे, पी. के. दहीकर आदींनी ६ एप्रिल रोजी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे केली होती. दोन महिन्यांनंतरही कारवाई न झाल्याने सदर कर्मचार्यांनी अखेर राजस्व समाधान शिबिरात दाद मागितली आहे.